सुवर्ण मंदिर आणि दुर्ग्याना मंदिरावर बॉम्ब हल्ल्याची धमकी

अमृतसर : पंजाबच्या अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि दुर्ग्याना मंदिरावर बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आले आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या नावानी लिहीलेले हे धमकीचे पत्र अमृतसर रेल्वे स्टेशनच्या अधीक्षकांना मिळाले आहे. त्यानंतर पोलिसांनी धार्मिक स्थळांभोवती आणि शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. रेल्वे स्टेशनसह इतर सार्वजनिक ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


याबाबत पोलिस आयुक्त सुधांशू शेखर श्रीवास्तव यांच्या आदेशानुसार सुवर्ण मंदिर आणि दुर्गायन मंदिराची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. तिथे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे. डीसीपी (कायदा आणि सुव्यवस्था) अमरिक सिंग पवार यांनी शहरातील रहिवाशांना पोलिसांना सहकार्य करण्याचे आणि अफवा पसरवणाऱ्यांबद्दल तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तब्बल 2 पानांचे हे पत्र हिंदी भाषेमध्ये लिहिले आहे.


पत्र लिहिणाऱ्याने स्वतःला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा एरिया कमांडर तस्लीम मौलवी असे म्हंटले आहे. तसेच त्याने आपले पत्ता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानचे कराची असा नमूद केला आहे. पत्रात लिहिले आहे की त्यांची संघटना कोणत्याही परिस्थितीत अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही. या यात्रेत सहभागी होणाऱ्या कोणत्याही हिंदू किंवा शीख व्यक्तीला जम्मू मध्येच बॉम्बने उडवून दिले जाईल.' पत्रात लिहिले आहे की, 'आम्ही इशारा देत आहोत की कोणीही अमरनाथ यात्रा करू नये. लवकरच जम्मू रेल्वे स्टेशन, पठाणकोट, अमृतसर, फिरोजपूर, जयपूर, जोधपूर आणि बिकानेर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून दिली जातील. यासोबतच, अमृतसरचे सुवर्ण मंदिर आणि दुर्ग्याना मंदिर देखील उद्ध्वस्त केले जाईल. लवकरच, जम्मू-काश्मीर आणि पंजाबची भूमी रक्ताने रंगवली जाईल असा इशारा देण्यात आलाय.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला