Thursday, August 14, 2025

भारतीयांसाठी एक्सचे सबस्क्रिप्शन झाले स्वस्त

भारतीयांसाठी एक्सचे सबस्क्रिप्शन झाले स्वस्त

नवी दिल्ली : इलॉन मस्क यांच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने भारतीय वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने आपल्या प्रीमियम व सबस्क्रिप्शन योजनांच्या दरांमध्ये लक्षणीय कपात केली असून, आता या सेवा परवडणाऱ्या झाल्या आहेत.


मोबाईल अॅपसाठी मासिक प्रीमियम सब्स्क्रिप्शनचा दर ९०० रुपयांवरून थेट ४७० रुपयांवर आणण्यात आला आहे. ही एकूण ४८ टक्के कपात आहे, ज्यामुळे अधिकाधिक वापरकर्ते प्रीमियम फीचर्स वापरण्यास प्रवृत्त होतील. वेब ब्राउझरद्वारे एक्स वापरणाऱ्या युजर्ससाठी प्रीमियम सब्स्क्रिप्शनचे दर आता ६५० रुपयांवरुन ४२७ रुपये झाले आहेत.

Comments
Add Comment