Monday, August 4, 2025

मनपा निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा - अजित पवार

मनपा निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा - अजित पवार

पुणे : येत्या काळात महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाला लागा, निवडणुकीचा जो निर्णय होईल तो होईल, आपण आपली प्रत्येक प्रभागात तयारी करा, अशा सूचना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख नेेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.


मुंबई, पुण्यासह 35 महापालिकांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. यासाठी महायुती व महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व नेते मंडळींची पुण्यात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


पुण्यात आपल्याकडे संख्याबळ चांगले आहे, प्रत्येक प्रभागापर्यंत पक्ष पोहोचवा सदस्य नोंदणी करा, मी स्वतः पुण्यात पक्षात लक्ष घालेन, ऑगस्ट महिन्यात मी सगळा आढावा घेणार आहे. दुसरीकडे त्यांनी नवीन शहराध्यक्षांना येत्या काळात शहरातील कार्यकारिणी तयार करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा