भाजपाचा माजी आमदार असलेल्या अभिनेत्याचा मृत्यू, तीन दिवसांपूर्वी साजरा केलेला वाढदिवस

हैदराबाद : भाजपाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी तीन दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा केला होता. रविवार १३ जुलै २०२५ रोजी हैदराबादमधील फिल्मनगर येथील घरी कोटा श्रीनिवास राव यांनी अखेरचा श्वास घेतला.

कोटा श्रीनिवास राव यांचा जन्म १० जुलै १९४२ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कांकीपाडू येथे झाला. त्यांनी १९७८ मध्ये 'प्रणम खरेधू' या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. आपल्या चार दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत त्यांनी ७५० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले. त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका जास्त गाजल्या. तेलुगू चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. निवडक चित्रपटांतून त्यांनी सकारात्मक आणि विनोदी भूमिकाही साकारल्या.

चित्रपटसृष्टीत यश मिळवणाऱ्या कोटा श्रीनिवास राव यांनी १९९० च्या दशकात भाजपात प्रवेश केला. ते १९९९ मध्ये विजयवाडा पूर्व विधानसभा मतदारसंघातून आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून आले. सिनेविश्वात येण्याआधी काही काळ बँकेत नोकरी केलेल्या कोटा श्रीनिवास राव यांनी पुढे अभिनय क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली.

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी कोटा श्रीनिवास राव यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोटा श्रीनिवास राव यांना आधी डॉक्टर व्हायचे होते, परंतु अभिनयाच्या त्यांच्या आवडीमुळे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

आर. चंद्रू यांचा 'कबजा' हा कोटा श्रीनिवास राव यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात उपेंद्र राव, शिवा राजकुमार, किचा सुदीप, श्रिया सरन आणि मुरली शर्मा सारखे कलाकार होते.
Comments
Add Comment

इन्स्टा स्टार मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार ?

नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यातच उमेदवार म्हणून मिथिलामधून

आधी साठ कोटी जमा करा, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

व्यावसायिक राज कुंद्रा आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी या दोघांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा

'दशावतार' चित्रपटाचे रिषभ शेट्टीने केले कौतुक! म्हणाला, असे चित्रपट पुढील पिढीसाठी दस्ताऐवज आहेत

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी सध्या आपल्या कांतारा चॅप्टर १ या नवीन चित्रपटामुळे

रेणुका शहाणेचा ५९ वा वाढदिवस, दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा!

मुंबई : सलमान खानसोबत पहिल्यांदाच सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी मराठी

कांतारा चॅप्टर १ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात जबरदस्त कमाई

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी

दुर्गा ऑफ अल्ट्रा झकास, ओटीटीवर स्त्रीशक्तीचा उत्सव

दुर्गा ऑफ अल्ट्रा झकास – नवरात्रीत मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीशक्तीच्या नऊ रूपांचा अल्ट्रा झकास ओटीटीवर