युरोपियन युनियन, मेक्सिकोवर अमेरिकेचा टॅरिफ बॉम्ब

मेक्सिकोतून अमेरिकेत ड्रग्जची तस्करी होत असल्याचा आरोप


वॉशिंग्टन, डी.सी. : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको व युरोपियन युनियनवर ३० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. मेक्सिको व युरोपियन युनियनवरील टॅरिफ १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवर टॅरिफ लादताना एक लेटर पाठवले आहे.


मेक्सिकोतून अमेरिकेत ड्रग्जची तस्करी होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. युरोपियन युनियनमुळे व्यापारात असंतुलन निर्माण होत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सहा व्यापारी भागीदार देशांवर टॅरिफ लादले होते. त्यामध्ये लीबिया, अल्जीरिया, इराक, मोल्दोवा, फ्लीलीपीन्स आणि ब्रुनोईचा समावेश होता.


डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत २० हून अधिक देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. यामध्ये म्यानमार, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि जपानचा देखील समावेश होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी यामध्ये अमेरिकेच्या मित्र देशांना देखील सोडले नाही.



कोणत्या देशावर किती टॅरिफ?


अमेरिकेने ब्राझीलवर सर्वाधिक ५० टक्क्यांपेक्षा अधिक टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर म्यानमार आणि लाओसवर ४०-४० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. कंबोडिया आणि थायलंड ३६ टक्के, बांगलादेश आणि सर्बियावर ३५ टक्के, इंडोनेशियावर ३२ टक्के, बोस्निया आणि हर्जेगोविनावर ३० टक्के, दक्षिण आफ्रिकेवर ३० टक्के, जपान, कझाकिस्तान, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि ट्यूनिशियावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी करारा संदर्भात चर्चा सुरू आहेत. भारताकडून शिष्टमंडळ अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहे. अमेरिकेला भारतातील कृषी, डेअरी क्षेत्र खुले करण्याची अपेक्षा आहे. भारताने कृषी आणि डेअरीमधील उत्पादनांवर लादलेले आयात शुल्क कमी करावे, अशी अमेरिकेची भूमिका आहे. भारत मात्र त्याला तयार नाही.

Comments
Add Comment

'ऑपरेशन सिंदूर'ने अझर मसूदच्या कुटुंबालाच संपवले; तुकडे तुकडे केले!

नवी दिल्ली: भारताच्या धडक कारवाईने दहशतवाद्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. आपल्या देशाच्या सुरक्षेला

अमेरिका-व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढला, अमेरिकेचा ड्रग्ज जहाजावर मोठा हल्ला

वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाहून अमेरिकेकडे येत असलेल्या एका संशयित ड्रग्ज जहाजावर पुन्हा एकदा लष्करी

नेपाळमध्ये सुशीला सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या Gen-Z ला मिळणार शहीदांचा दर्जा

काठमांडू: नेपाळमध्ये सुशीला कार्की सरकार स्थापन झाल्यानंतर देश हळूहळू आता स्थिरस्थावर होत आहे. सोमवारी सुशीला

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या