Sunday, August 31, 2025

तामिळनाडूत मालवाहक गाडीला आग, रेल्वे सेवा विस्कळीत

तामिळनाडूत मालवाहक गाडीला आग, रेल्वे सेवा विस्कळीत
तिरुवल्लूर : तामिळनाडूमधील तिरुवल्लूर येथे डिझेल घेऊन जात असलेल्या मालगाडीला आग लागली. ही गाडी चेन्नई येथून इंधन घेऊन निघाली होती. मालगाडीला आग लागल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मालगाडीच्या चार डब्यांना आग लागली आहे. या डब्यांना मालगाडीपासून वेगळे केले आहे. मालगाडी रुळावरुन घसरल्यानंतर आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. पण आग लागलण्याचे नेमके कारण समजलेले नाही. आग लागण्याच्या कारणाची चौकशी होणार आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासाला सुरुवात केली आहे.
Comments
Add Comment