कानाची बात

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड


आई म्हणाली कानाची
काय सांगू बात
जरा खुट्ट वाजले की,
लगेच टवकारतात

हलक्या हाताने कधी
स्वतःला घेतात टोचून
दिमाखात मिरवतात
कधी कर्णफुले घालून

ओरडणं, खिदळणं
सारं सारं ऐकतात
नको ते ऐकून कधी
अडचणीतही आणतात

काहीजण गुपचूपपणे
कानमंत्र देतात
काहीवेळा दुर्लक्ष करून
कानामागे टाकतात

काही आपले कान उपटून
चांगलाच धडा देतात
लक्षात ठेवून हे काहीजण
कानाला लावतात खडा

कान देऊन ऐकल्यावर
सापडतो चांगला सूर
हलक्या कानाचा असणे
या दुर्गुणाला ठेवावे दूर

दुसऱ्यांबद्दल कान भरणे
ही गोष्ट चांगली नाही
कानीकपाळी ओरडून
आई सतत सांगत राही.
Comments
Add Comment

दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्ती

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे दोन विषयांनी माणसाची शक्ती जागृत होते. दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्तीने माणूस

सुगंध कर्तृत्वाचा

स्नेहधारा : पूनम राणे इयत्ता आठवीचा वर्ग. वर्गात स्काऊट गाईडचा तास चालू होता. अनघा बाई परिसर स्वच्छता आणि

स्त्रीधन

क्राइम : अॅड. रिया करंजकर समाजामध्ये नजर टाकली, तर लग्न टिकवण्यापेक्षा घटस्फोटाचे प्रमाण वाढत असलेले दिसून येत

देवराई

देवराई ही संकल्पना आता लोकांना नवीन नाही. पण ही संकल्पना फक्त देवाचे राखीव जंगल किंवा देवाचे वन एवढ्यापुरती न

अच्छा लगता हैं!...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे आपण नेहमी आपल्याला आवडलेल्या गाण्यांना ‘जगजीत सिंगची गझल’, ‘चित्रा सिंगची

क्षमा आणि शिक्षा...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर संत एकनाथांच्या बाबतीत असं सांगतात की एकदा एकनाथ महाराज नदीवरून स्नान करून येत असताना