Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

कानाची बात

कानाची बात

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड

आई म्हणाली कानाची काय सांगू बात जरा खुट्ट वाजले की, लगेच टवकारतात हलक्या हाताने कधी स्वतःला घेतात टोचून दिमाखात मिरवतात कधी कर्णफुले घालून ओरडणं, खिदळणं सारं सारं ऐकतात नको ते ऐकून कधी अडचणीतही आणतात काहीजण गुपचूपपणे कानमंत्र देतात काहीवेळा दुर्लक्ष करून कानामागे टाकतात काही आपले कान उपटून चांगलाच धडा देतात लक्षात ठेवून हे काहीजण कानाला लावतात खडा कान देऊन ऐकल्यावर सापडतो चांगला सूर हलक्या कानाचा असणे या दुर्गुणाला ठेवावे दूर दुसऱ्यांबद्दल कान भरणे ही गोष्ट चांगली नाही कानीकपाळी ओरडून आई सतत सांगत राही.
Comments
Add Comment