बिग बॉस फेम या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात चोरी! ४.५ लाखांची रोकड घेऊन नोकर पसार

मुंबई:  'बिग बॉस' फेम अभिनेत्री कशिश कपूरच्या अंधेरीतील घरातून तब्बल ४.५ लाख रुपयांची चोरी झाली असून, तिचा नोकर सचिन कुमार हा पैशांसह फरार झाला आहे. या प्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


कशिश कपूर ही मूळची बिहारची असून, सध्या अंधेरीतील वीरा देसाई रोडवरील न्यू अंबिवली सोसायटीमध्ये राहतात. तिने आपल्या घरी गेल्या पाच महिन्यांपासून काम करणाऱ्या नोकर सचिन कुमारविरोधात चोरीची तक्रार दाखल केली आहे. सचिन दररोज सकाळी ११:३० वाजता येऊन दुपारी १ वाजता काम संपवून घरी जात असे. मात्र, यावेळी तो घरातून ४.५ लाख रुपये घेऊन अचानक गायब झाला आणि अद्याप त्याचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही.


कशिशने सांगितले की, तिने आपल्या आईला पैसे पाठवण्यासाठी एकूण ७ लाख रुपये घरी ठेवले होते. ९ जुलै रोजी जेव्हा तिने कपाट उघडले, तेव्हा तिला फक्त २.५ लाख रुपयेच मिळाले. उरलेले पैसे सगळीकडे शोधूनही सापडले नाहीत. त्यानंतर तिने सचिनकडे विचारणा केली, तेव्हा तो घाबरून घरातून पळून गेला. यामुळे कशिशचा संशय अधिकच बळावला आणि तिने अंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.


कशिश कपूर हिने 'बिग बॉस' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. तसेच ती काही हिंदी मालिकांमध्येही झळकली आहे. सध्या पोलिस आरोपी सचिन कुमारचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं