
इंटरव्ह्यू म्हणजे तुमच्या स्वप्नांना,जीवनाला नवी दिशा देण्याची संधी, मात्र यशस्वी इंटरव्ह्यू साठी तयारी हवी. चला, जाणून घेऊया काही खास टिप्स, ज्या तुम्हाला बनवतील इंटरव्ह्यू स्टार
ज्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यायची आहे, त्या कंपनीबद्दल आधी माहिती काढा. त्यांची वेबसाईट, सोशल मीडिया तपासा. तुमच्या अनुभवाची आणि कौशल्यांची तयारी करा. संभाव्य प्रश्नांची उत्तरं तयार ठेवा. short , point आणि योग्य वाक्यरचना करा. यात तुमचा अनुभव, शिक्षण, तुमच्या weakpoints आणि strong points कोणत्या आहेत हेही इंटरव्ह्यू वेळी लक्षात ठेवा. तसंच तुम्ही कंपनीसाठी काय करू शकता, याबद्दल माहिती विश्वासाने इंटरव्ह्यू घेणाऱ्यासमोर मांडा.
?si=eKmWwWIeTXZmEZk2
इंटरव्ह्यू दरम्यान शांत, आत्मविश्वासपूर्ण राहा. प्रश्न नीट ऐका, खरं आणि सकारात्मक बोला. योग्य पोशाख, वेळेवर उपस्थिती आणि body language Interview साठी आवश्यक असते. इंटरव्ह्यू संपल्यानंतरही इंटरव्ह्यू घेणाऱ्याचे धन्यवाद माना. अनुभव शेअर करा आणि प्रतिक्रिया मागा. प्रत्येक इंटरव्ह्यू तुम्हाला पुढच्या संधींसाठी तयार करते याचंही भान ठेवा.