महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून संभ्रम दूर


मुंबई : येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महायुती एकत्रित लढणार असल्याचे सांगत महायुती एकत्र निवडणूक लढणार की स्वबळावर याबाबतचा संभ्रम संभ्रम भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दूर केला आहे.


त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्रित या निवडणुका लढण्याचे संकेत मिळत असल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे महायुतीनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी महायुती म्हणूनच महापालिका निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले. महापालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्या महायुती म्हणूनच लढवल्या जातील.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अधिवेशन संपल्यावर प्रत्येक विभागात आम्ही जाणार आहोत. कार्यकर्ते आणि जिल्ह्याच्या टीमशी संवाद साधणार आहोत. भेटीगाठी होणार आहेत. कार्यकर्ता आणि नेता एकत्र चर्चा करतील. येणाऱ्या काळात महायुतीचे चांगले वातावरण करू आणि सर्व महापालिकांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढू. मुंबई ठाणे पालिकेच्याही लढू. आम्हाला वातावरण पोषक आहे. त्यामुळे एकत्र लढण्याचे ठरवले आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.


हिंदीबाबतचा संभ्रम कोणात नाही. फक्त राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये संभ्रम आहे. त्यांचा संभ्रम दूर करण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. पण त्यांनी हा मुद्दा निवडणुकीचा केला असेल तर त्याला काही करू शकत नाही. वाहिन्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. एखादा मुद्दा किती वेळ चालवावा यासाठी समिती स्थापन केली आहे. समिती या संदर्भातील अभ्यास करून अहवाल तयार करणार आहे. विधानसभेत तो पाठवेल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.



महापौरपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार


मुंबई महापालिकेच्या फॉर्म्युल्यावर वरिष्ठ पातळीवर त्यांची, आमची कोअर टीम बसून चर्चा करतील. जागा वाटपाचे सूत्र ठरवतील. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र बसून जागा वाटप ठरवतील. या नेत्यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे. तेच जागा वाटपाचे सूत्र ठरवतील, असे सांगतानाच महापौर पदाबाबतचा निर्णय त्यावेळी होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले तर महापौरपद एकनाथ शिंदे गटाला देऊ, असे रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण

Railway News : मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आता 'ओटीपी' बंधनकारक; रेल्वेचा नवीन नियम काय?

मुंबई : रेल्वे प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये सुरक्षितता आणि पारदर्शकता मिळावी, यासाठी भारतीय रेल्वेने एक

मुंबईतील सर्वाधिक खोल शहरी बोगद्याचे काम सुरू

‘ऑरेंज गेट टनेल’ जून २०२८ पर्यंत पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; ७०० इमारतींच्या खालून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या