Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Diamond League: पॅरिस ऑलिंपिकनंतर पहिल्यांदाच नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम एकमेकांसमोर येणार

Diamond League: पॅरिस ऑलिंपिकनंतर पहिल्यांदाच नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम एकमेकांसमोर येणार
नवी दिल्ली: पोलंडमधील सिलेसिया येथे १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या डायमंड लीग मध्ये दुहेरी ऑलिंपिक पदक विजेता नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा गतविजेता अर्शद नदीम यांच्यात बहुप्रतिक्षित सामना होईल. पॅरिस ऑलिंपिक २०२४ नंतर या दोन्ही खेळाडूंमध्ये ही पहिलीच लढत असेल. ८ ऑगस्ट २०२४ रोजी पॅरिसमध्ये झालेल्या पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या एक वर्षानंतर नीरज आणि नदीम एकमेकांसमोर येतील. नदीमने पॅरिसमध्ये ९२.९७ मीटरच्या शानदार थ्रोसह नीरज चोप्राला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले होते. टोकियो ऑलिंपिक २०२१ मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या २७ वर्षीय चोप्राला पॅरिसमध्ये ८९.४५ मीटरच्या सर्वोत्तम भालाफेकीसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या निवेदनात म्हटले आहे की, चोप्रा आणि नदीम सिलेसिया डायमंड लीगमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत भाग घेतील. सिलेसिया डायमंड लीगच्या आयोजकांनीही चोप्रा आणि नदीम यांच्यातील सामन्याची पुष्टी केली. त्याचप्रमाणे २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमधील पभवाची परतफेड करण्याची नीरजसमोर ही नामी संधी असणार आहे. प्रतिष्ठित डायमंड लीग स्पर्धेतील स्पर्धकांची घोषणा करताना, आयोजकांनी सांगितले की, पोलंडमधील चाहते नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहेत. पॅरिस ऑलिंपिकनंतर भारताच्या नीरज चोप्रा आणि त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यातील सामना क्रीडा प्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
Comments
Add Comment