
मिळालेल्या माहितीनुसार, एका निवृत्त सहाय्यक पोलिस फौजदाराकडे असलेल्या सालगड्याचे फक्त बाराशे रुपयांसाठी अपहरण करण्यात आले. आणि त्याच्याकडून दीड लाख रुपये उकळण्यात आले. निवृत्त पोलिस अधिकारी जेव्हा सालगड्याला सोडविण्यासाठी गेले असता त्यांना देखील बेदम मारहाण करण्यात आली. आणि यानंतर त्यांना एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. दरम्यान त्यांनी पाणी मागितले असता आरोपी पैकी तीन जणांनी त्यांच्या तोंडावर लघुशंका केली.
या मारहाणीत निवृत्त फौजदाराला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी माजलगाव पोलिस ठाण्यात १० ते १२ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.