
धोकादायक फांद्या, वृक्ष हटविल्याने नागरिकांमध्ये समाधान
नाशिक : अवकाळी पाऊस व त्या पाठोपाठच मान्सून सुरू होऊन वादळी वारा व मुसळधार पावसाने नवीन नाशिकच्या अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या.
काही वृक्ष देखील उन्मळून पडले होते. यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक व जीवित हानी झाली होती. याबाबत धोकादायक फांद्या वृक्ष हटविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते योगेश कातकाडे यांनी पालिका प्रशासनाची भेट घेत रस्त्यावरील वृक्षांचे सर्वेक्षण करून धोकादायक फांद्या व वृक्ष काढण्याची मागणी केली होती याची दखल घेतली.
उद्यान विभागाचे अधिकारी प्रशांत परब यांनी गणेश चौक, पेलिकन पार्क लगत रस्त्यावरील धोकादायक फांद्या व वृक्ष काढल्याने भविष्यातील धोका, अपघाताला आळा बसेल अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त करत महापालिका प्रशासनाच्या कामकाजाबद्दल आभार व्यक्त केले.
नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
नवीन नाशिकमध्ये शाळा- महाविद्यालय असल्याने शालेय विद्यार्थी, पालक ह्या रस्त्याने जात येत असतात. या ठिकाणी झाडांच्या फांद्या थेट रस्त्यावरती खाली झुकलेल्या होत्या सदरची बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत धोकादायक फांद्यांमुळे भविष्यात कुठल्याही अपघात किंवा कोणालाही हानी होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी अशी विनंती केली होती. त्यावर तत्काळ दाखल केली महापालिका उद्यान विभागाचे अधिकारी प्रशांत परब यांनी कारवाई केल्याने विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
- योगेश भास्कर कातकाडे, सामाजिक कार्यकर्ते, नवीन नाशिक