Monday, October 27, 2025
Happy Diwali

Jayant Patil Resigns : मोठी बातमी! जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार! शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष!

Jayant Patil Resigns : मोठी बातमी! जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार! शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठ्या हालचाली झाल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील (Jayant Patil) पायउतार झाले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आता शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. १५ जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. गेल्या काही दिवसांआधी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करा, अशी मागणी केली होती.
१० जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनीच, मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली होती. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. ७ वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >