
नवी मुंबई : नवी मुंबईच्या विमानतळाचं काम पूर्ण होत आलंय. आता लवकरच नवी मुंबईचं हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. हे विमानतळ कधी सुरु होणार तसेच या विमानतळाची खासियत काय असणार? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. तसेच या विमानतळासाठी एक मोठी कनेक्टिव्हिटीही तयार करणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जगातील सर्वात फास्ट बॅगेज क्लेम व्यवस्था
‘आज नवीन मुंबईत विमानतळ याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मी आणि शिंदे आलो. आता त्याच्या प्रगतीसाठीचं सादरीकरण पाहिलं. रनवे पासून टर्मिनल बिल्डिंग पर्यंतची प्रगती पाहिली. साधारणपणे याची भौतिक प्रगती ९४ टक्के झाली आहे. रनवे सुसज्जित आहे. टर्मिनल बिल्डिंगचं काम झालं. इंटिरियरचं काम सुरू आहे. बाहेरच्या सिलिंगचं काम वेगानं सुरू आहे. बॅगेज हँडलिंगची सिस्टिम पाहिली. अत्यंत चांगली सिस्टिम आहे. बॅगेचा बारकोड ३६ डिग्रीतून पाहता येईल. ती योग्य ठिकाणी जाईल. या एअरपोर्टवर बॅगेज क्लेम ही व्यवस्था जगातील फास्टेट व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेव्हा पूर्ण एअरपोर्ट होईल तेव्हा दोन रनवे या क्षमतेने ९ कोटी प्रवाशांसाठी एअरपोर्ट सुसज्ज होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट पेक्षा खूप मोठा एअरपोर्ट होणार आहे. हा ग्रीन एअरपोर्ट आहे. ग्रीन वीज वापरली जाणार आहे, अल्टरनेट फ्यूलची वाहने असणार आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जालना : जालन्यात रस्त्याच्या कामादरम्यान बेकायदेशीर खनिज उत्खनन केल्याबद्दल मेघा इंजिनिअरिंगला ९४.६८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कंपनीला ...
‘एक मोठी कनेक्टिव्हिटीही तयार करणार’
पुढे फडणवीस म्हणाले, ‘आपली विमाने जी फ्यूल वापरतात ती ग्रीन असेल हा प्रयत्न असेल. एक मोठी कनेक्टिव्हिटीही आपण तयार केली आहे. वॉटर ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली जाणार आहे. शहरातच बॅगेज चेकिंगची व्यवस्था करू. त्यांना बॅगेज शिवाय येता येणार आहे. अंडर ग्राऊंड मेट्रो एअरपोर्टला तयार करू. ती सर्व एअरपोर्टला कनेक्टेड असतील. त्यामुळे पायी चालावं लागणार नाही. तसेच वाहन घेऊन येण्याची गरज पडणार नाही.’
कधी सुरु होणार ?
नवी मुंबईतील विमानतळ कधी सुरु होणार याविषयी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘काही विमानतळावर एक एक किलोमीटर पायी चालावं लागतं. इथे ट्रॅव्हलेटर तयार करण्यात आलं आहे. देशातील सर्वात आधुनिक एअरपोर्ट तयार होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत विमानतळ पूर्ण करण्याचं टार्गेट दिलं आहे. पंतप्रधानांचीही वेळ घेणार आहे. १३ ते १४ हजार कामगार रोज काम करत आहे. कामगारांची संख्या दुप्पट तिप्पट वाढवायला सांगितली आहे.’