मुंबई : आता मुंबईहून गुजरात, जयपूर अन् अजमेरला जायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. मुंबईहून गुजरात, जयपूर अन् अजमेरला जाणाऱ्यांसाठी वांद्रे रेल्वे स्थानकातून अजमेरसाठी रेल्वेकडून खास साप्ताहिक रेल्वे सुरू करण्यात आली आहे. अजमेरहून प्रत्येक रविवारी ही एक्सप्रेस वांद्रेसाठी सुटेल. तर वांद्रेहून प्रत्येक सोमवारी अजमेरसाठी एक्सप्रेस धावणार आहे. गुजरात अन् राजस्थानला जाणाऱ्या अनेक प्रवाशांना या एक्सप्रेस ट्रेनचा फायदा होणार आहे. रेल्वेकडून एक्सवर ट्रेनचे वेळेपत्रक जारी केले आहे.
कसं असणार वांद्रे - अजमेर ट्रेनचं वेळापत्रक ?
पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस - अजमेर दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलाय.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९६२२ वांद्रे टर्मिनस - अजमेर सुपरफास्ट विशेष रेल्वे प्रत्येक सोमवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी ०९:३५ वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:५० वाजता अजमेरला पोहोचेल. ही रेल्वे १४ जुलै ते २९ सप्टेंबरपर्यंत चालेल.
ट्रेन क्रमांक ०९६२१ अजमेर - वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट विशेष रेल्वे प्रत्येक रविवारी अजमेर येथून सकाळी ०६:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०४:१५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. ही रेल्वे १३ जुलै ते २८ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक आठवड्याला धावेल.
प्रतिनिधी: अर्थविश्वातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.ज्याची प्रतिक्षा भारतीयांना व भारतीय गुंतवणूकदार, शेअर बाजारातील गुंतवणूकदार सगळ्यांना आहे ...
वांद्रे अजमेर ट्रेन कुठे-कुठे थांबणार?
वांद्रे स्थानक ते अजमेर यादरम्यान रेल्वेकडून साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस बोरिवली, वापीर, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, विक्रमगड अलोट, भिवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवई माधवपूर, जयपूर, किशनगड स्टेशनवर थांबेल. तिकिटासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. वांद्रे ते अजमेर यादरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये एसी २-टियर, एसी ३-टियर, एसी ३-टियर (इकॉनॉमी), स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास बोगी असतील.
ट्रेन क्रमांक ०९६२२ साठी बुकिंग १२ जुलैपासून IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. या साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेनबाबत आणखी माहिती जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.