Saturday, August 2, 2025

Gold Silver Crude: सोन्याच्या विदेशी साठ्यात प्रचंड वाढ ! कमोडिटी बाजारात सोन्यासह, चांदी व कच्च्या तेलातील भाव सुस्साट! 'ही' सविस्तर कारणे वाचा

Gold Silver Crude: सोन्याच्या विदेशी साठ्यात प्रचंड वाढ ! कमोडिटी बाजारात सोन्यासह, चांदी व कच्च्या तेलातील भाव सुस्साट! 'ही' सविस्तर कारणे वाचा
मोहित सोमण: सोने चांदी व कच्चे तेल तिन्हीत मोठी तुफानी वाढ झाली आहे.आंतरराष्ट्रीय कारणांमुळे बाजारातील कमोडिटीत दबाव निर्माण झाला आहे.विविध भूराजकीय,तसेच इतर देशांवर युएसकडून अतिरिक्त टेरिफ लावण्याच्या घडा मोडींमुळे ही वाढ सातत्याने होत आहे. मार्केटमधील अहवालानुसार,कालच्या चांदीच्या मोठ्या वाढीनंतर आता सोने व कच्चे तेल यांच्या किंमती उसळल्या आहेत. नक्की काय परिस्थिती कमोडिटीत आहेत ते पाहूयात....

काय आहे सोन्याच्या दरात जागतिक हालचाली?

सोन्याच्या दरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावामुळे सलग चौथ्यांदा सोन्यात वाढ झाली आहे.मागील आठवड्यापासून सोन्यातील अस्थिरता कायम राहिल्याने सातत्याने निर्देशांकात मोठी वाढ होत आहे. शनिवारी सकाळपर्यंत सोन्याच्या जाग तिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.१५% वाढ झाल्याने प्रति औंस किंमत ३३६४ डॉलर आहे.'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार,भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७१ रूपये वाढल्याने ९९७१ रूपयांवर,२२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ६५ रूपयांनी वाढत ९१४० रूपयांवर,१८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ५४ रुपयांनी वाढत ७४७९ रुपयांवर पोहोचली आहे.

प्रति तोळा किंमती देखील मोठ्या संख्येने वाढल्या आहेत.संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट प्रति तोळा किंमत ७१ रूपयाने वाढत ७१० रूपयांनी वाढत ९९७१० रूपयांवर गेली आहे तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ६५० रूपयाने वाढ त ९१४०० रूपयांवर गेली आहे.१८ कॅरेट प्रति तोळा किंमत ५४० रुपयांनी वाढत ७४७९० रूपयांवर गेली आहे.  सोन्याची पातळी पाहिल्यास तीन दिवसातच साधारणतः २४ कॅरेट प्रति ग्रॅम दर १५३० रूपयांनी,२२ कॅरेट प्रति ग्रॅम दर १४०० रूपयांनी वाढले आहेत. एकीकडे मागणीत वाढ होत असतानाच सोन्याचा पुरवठा घटला जात आहे. याशिवाय पुन्हा डॉलरमध्ये वाढ होत असल्याने सोन्याला भारतीय बाजारात सपोर्ट लेवल मिळू शकलेली नाही.डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ वाढीवरील अनिश्चिततेचे वलय अजूनही कायम असल्याने शेअर बाजारात रोख गुंतवणूकीपेक्षा सोन्याच्या साठ्यात मागणी वाढल्याने किंमतही वाढत आहे. मागील आठवड्यात सोन्यातील चढउतार होण्यापूर्वी काही दिवस सोने स्थिर राहिले होते. अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सोन्याच्या नफा बुकिंग केल्याने दर पातळी आणखी वाढत आहे.

युएस गोल्ड स्पॉट दरात सकाळपर्यंत ०.९९% वाढ झाली होती. तर भारतीय कमोडिटी बाजार (Multi Commodity Exchange MCX) यामध्ये ०.०१% वाढ झाली असून एमसीएक्सवरील दरपातळी ९७८३० रूपये प्रति तोळा सुरू आहे. भारतात मुंबई,पुण्यासह प्रमुख शहरांत २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९९७१,२२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९१४०, १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७५३० इतक्या दरपातळीने सुरू आहे.

सोन्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ !

आरबीआयने शुक्रवारी जाहीर केलेल्या ताज्या साप्ताहिक आकडेवारीनुसार,आठवड्यात देशाच्या सोन्याच्या साठ्यात ३४२ दशलक्ष डॉलर्स वाढ झाली आहे आणि ते ८४.८४६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले आहे. सोन्यासोबतच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत असलेले विशेष रेखांकन हक्क (Special Drawing Rights SDRs)३९ दशलक्ष डॉलर्सने वाढून १८.८६८ डॉलर्स अब्ज झाले आहेत अशी माहिती आरबीआयच्या अहवालात म्हटली गेली आहे.

विशेषतः आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत देशाचा राखीव साठा १०७ दशलक्ष डॉलर्सने वाढून ४.७३५ डॉलर्स अब्ज झाली आहे असे अधिकृत आकडेवारीत म्हटल गेलं आहे.आरबीआयने सांगितले आहे की, '४ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा ६९९.७३६ अब्ज डॉलर्स होता.मागील आठवड्यात.राखीव साठा ४८८९ डॉलर्स अब्ज ने वाढून ७०२.७८४ अब्ज डॉलर्स झाला होता. सप्टेंबर २०२४ च्या अखेरीस साठा $७०४.८८५ अब्ज या नव्या उच्चांकावर पोहोचला डॉलरच्या संदर्भात व्यक्त केल्यास,चलन साठ्यापैकी युरो,पौंड आणि येन सारख्या गैर-अमेरिकन युनिट्सच्या वाढ किंवा अवमूल्यनाचाहि परिणाम समाविष्ट आहे अशी माहिती अहवालातून समोर आलेली आहे. देशात परदेशात दोन्ही ठिकाणी,दोन्ही सराफा बाजारात मोठी दिसून येत असताना राखीव ठेवींमध्येही वाढ झाली होती.काल भारतातील सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली, चांदीच्या किमतींनी तर काल नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA),२४ कॅरेट सोन्याची किंमत ४६५ रुपयांनी वाढून ९७,५११ रुपये प्रति १० ग्रॅम झाली, जी एका दिवसापूर्वी ९७,०४६ रुपयांवरून वाढली आहे.

चांदीच्या दरातही सलग दुसऱ्यांदा वाढ !

परवा चांदीच्या दरात उसळी घेतल्यानंतर आज पुन्हा तिसऱ्यांदा चांदीच्या दरात वाढ होत आहे.संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ४ रुपयांनी वाढली आहे.तर प्रति किलोमागे चांदीचा दर ४००० रूपयांनी वाढला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने चांदीच्या दरात वाढ होत आहे.जागतिक पातळीवरील चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांक (Silver Future Index) यामध्ये ४.४२% वाढ झाली आहे. कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये  भारतातील चांदी च्या प्रति किलो निर्देशांकात ३.६५% वाढून दरपातळी ११३१११.०० रूपयांवर पोहोचल्याने चांदीच्या मागणीत आणखी वाढ होत आहे.भारतातील मुंबईसह प्रमुख शहरांत चांदीचा दर प्रति ग्रॅम किंमत ११५० रूपये असून प्रति किलो किंमत १२ ५००० रूपयांवर पोहोचली आहे.

चांदीत इतकी वाढ का होत आहे?

व्यापाराशी संबंधित आंतरराष्ट्रीय दबावामुळे सुरक्षित आश्रयस्थानांच्या आकर्षणाचा भाग म्हणून चांदी वढचर ठरली आहे.राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ब्राझिलियन वस्तूंवर ५०% नवीन कर आणि तांबे आणि औषधांवर वाढत्या शुल्कासह वाढत्या जका तींच्या धमक्यांसह शुक्रवारी व्यापक जागतिक अनिश्चिततेला चालना दिली होती.त्याचाच परिणाम म्हणून मॅक्रो बाजूने (Micro Aspect) ही वाढ होत आहे. अमेरिकन कामगार डेटात मोठी अनपेक्षित कामगिरी केल्यामुळे सुरुवातीच्या बेरोज गारी मुद्यांवर असलेली अनिश्चितता नष्ट झाली व चौथ्या आठवड्यात सात आठवड्यांतील सर्वात कमी पातळीवर आली आहे.ज्यामुळे उच्च व्याजदर असूनही अर्थव्यवस्थेची लवचिकता (Flexibility) अधोरेखित होते. बाजारातील माहिती नुसार,सिल्व्हर इन्स्टिट्यूटने सलग पाचव्या वर्षी लक्षणीय बाजारपेठेतील तूट भाकित केली आहे,चालू असलेल्या हरित अर्थव्यवस्थेच्या औद्योगिक मागणी ७०० दशलक्ष औंसपेक्षा जास्त विक्रमी उच्चांकपातळी चांदी गाठण्याची अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे.

कच्च्या तेलाच्या निर्देशांकात आज तुफानी !

कच्च्या तेलाच्या निर्देशांकात आज तुफानी वाढ झाली आहे.जागतिक अनिश्चिततेचा पायावर रेड सी मधील अनिश्चितता, अमेरिकेचे टेरिफ धोरण,तसेच डॉलरमध्ये झालेली वाढ,सोन्यातील घटलेली गुंतवणूक व चांदीच्या पर्यायात मागील आठ वड्यात गुंतवणूकदारांनी केलेली नफा बुकिंग,रशियन तेलावर अमेरिकेने वाढवलेला दबाव अशा अनेक एकत्रित कारणांमुळे कच्चे तेल (Crude) महागले आहे. शुक्रवारी तर कच्चे तेल २% वाढले होते असे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) कडून स्पष्ट करण्यात आले होते या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात २.२%, Brent Futures निर्देशांकात ३% वाढ या आठवड्यात झालेली आहे. यापूर्वी ओपेकने आपले उत्पादन वाढविण्यासाठी काम करणार अ सल्याचे स्पष्ट केले होते. मात्र तरी अमेरिकेकडून वेगवेगळ्या येणाऱ्या वक्तव्यानंतर युएस रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा फटका कच्च्या तेलाच्या किंमतीत बसत आहे.याशिवाय पुन्हा एकदा औद्योगिक उत्पादनात मागणी वाढल्याने निर्देशांक उसळत आहे.
Comments
Add Comment