
प्रतिनिधी: भारताच्या विदेशी साठ्यात प्रचंड घसरण झाली आहे. सोन्याच्या साठ्यात वाढ झाली असली तरी परकीय चलनसाठा (Foreign Exchange Reserve Forex) घसरला आहे. सततच्या डॉलर रूपया व इतर चलनात होत असलेल्या चढ उताराने बाजारातील अस्थिरता वाढली. परिणामी भारताच्या विदेशी साठ्यात घट झाली.आरबीआयच्या सरकारी आकडेवारीनुसार, परकीय चलनसाठ्यात चार जुलैपर्यंत ६९९.७३६ अब्ज डॉलर्सवरून घसरत आकडेवारी ३.०४९ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. चलनसाठ्यातील परदेशी चलनात ४ जुलै २०२५ पर्यंत ५९१.२८७ अब्ज डॉलरवरून घसरत ३.५३७ अब्ज डॉलर्सवर चलनसाठा राहिला आहे.विशेष रेखांकन अधिकार (Special Drawing Rights SDRs) यामध्ये चलनसाठ्यातील प्रमाण घसरत ३९ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना (International Monetary Fund IMF) मधील आकडेवारीनुसार, संरक्षित चलनसाठा मात्र १०७ दशलक्ष डॉलर्सवरून वाढत ४.७३५ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. यापूर्वीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 'भारताला सहज ११ महिने पुरेल इतका परकीय चलनसाठा आपल्याकडे उपलब्ध आहे ' असे विधान वित्तीय पतधोरण समितीचा निकाल जाहीर करताना केले होते. दुसरीकडे,आरबीआयच्या आकडेवारीनुसार, मागील आठवड्यात सोन्याचा साठा ३४२ दशलक्ष डॉलर्स वाढून ८४.८४६ अब्ज डॉलर्स झाला आहे. जागतिक बँकेकडे असलेले विशेष रेखांकन हक्क (Special Drawing Rights SDRs) देखी ल ३९ दशलक्ष डॉलर्सवरून वाढत १८.८६८ अब्ज डॉलर्स झाले आहेत तर आयएमएफकडे देशाची राखीव आर्थिक परिस्थिती देखील १०७ दशलक्ष डॉलर्सवाढून ४.७३५ अब्ज डॉलर्स झाली आहे.
यापूर्वी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये चलनसाठा, आर्थिक वर्ष २००२ मधील ७१ अब्ज डॉलर्समध्ये ५८ अब्ज आणखी वाढला होता.आर्थिक वर्ष २०२४ मध्ये हा चलनसाठा २० अब्ज डॉलर्सने वाढल्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये परकीय चलनसाठा ७० ४.८८५ अब्ज डॉलर्स या नव्या उच्चांकावर पोहोचला.आरबीआय जगभरातील अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी भारत आपल्या खजिन्यात जास्तीत जास्त चलन व सोनेसाठा वाढवत असते. जितके चलनसाठा अधिक तितकी देशाची आर्थिक स्थि ती मजबूत समजली जाते. भारताच्या अर्थकारणातील परिस्थितीही मजबूत असल्याने याचा आणखी फायदा चलनसाठ्यात होत आहे. मात्र यंदा ४ जुलैपर्यंत रूपयांच्या घसरणीशिवाय, कमोडिटी, व बाजारातील चढउताराचा काही प्रमाणात फटका धातू व चलनाला बसला आहे. रूपयांची घसरण होत असताना किंवा अर्थव्यवस्थेत चलनाची तुट असताना डॉलर विकून आरबीआय बाजारातील तरलता (Liquidity) टिकवण्यासाठी प्रयत्न करते.