ठाण्यात डम्परचा अपघात; पोलिसाचा मृत्यू

  65

ठाणे : ठाणे येथील कॅडबरी चौकाच्या परिसरात एका डम्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. या घटनेमुळे ठाणे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून डम्परचालकाला अटक केली आहे.


राजकुमार चौधरी असे अटक करण्यात आलेल्या डम्पर चालकाचे नाव आहे. सुरेश भालेराव असे अपघातात मृत पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते ठाण्यातील वर्तकनगर येथील शिवाईनगर भागात राहत होते. ते ठाणे पोलिस दलात पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. त्यांची नेमणुक ठाणे पोलिस मुख्यालयात होती. सुरेश भालेराव हे शनिवारी सकाळी १०.३० वाजता कामावर जाण्यासाठी निघाले. दुचाकीने ते कामावर जात होते. कॅडबरी चौकातील ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या वाहिनीवरून त्यांची दुचाकी जात होती. त्याचवेळी एक भरधाव डम्पर आला आणि त्याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते दुचाकीवरून खाली पडले आणि त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी डम्परचालक राजकुमार चौधरी याला अटक केली आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

"बाळाच्या रंगावरून बोलाल तर खबरदार..." टीव्ही अभिनेत्रीने ट्रोलर्सना खडसावले, केली थेट कायदेशीर कारवाई

हिंदी टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या ७ महिन्यांच्या बाळाला सावळ्या रंगामुळे ट्रोल करण्यात

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक