Tuesday, August 19, 2025

Breaking ! 8th Pay Commission : आठव्या पे कमिशनला अखेर शासनाकडू़न मान्यताप्राप्ती 'या' तारखेनंतर लागू?

Breaking ! 8th Pay Commission : आठव्या पे कमिशनला अखेर शासनाकडू़न मान्यताप्राप्ती 'या' तारखेनंतर लागू?
प्रतिनिधी: अखेर आठवे वेतन आयोगाच्या संदर्भात मोठी माहिती पुढे आली आहे. केंद्र सरकारने आठवे वेतन आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आहेत. यासंबंधीची अधिकृत घोषणा सरकारने अजून केली नाही. पण प्रसारमाध्यमांच्या सुत्राप्रमाणे, या मागण्या मान्य झाल्या आहेत. लवकरच याविषयी घोषणा केंद्र सरकार करू शकते. आठव्या वेतन आयोग (8th Pay Commision) लागू केले जाऊ शकेल ज्याचा फायदा करोडो कर्मचारी व निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे.

सध्या या शिफारशीची कागदी पूर्तता सुरु आहे. प्रत्यक्षात तो मिळाला आणखी काही अवधी लागू शकतो. असे सांगण्यात आले की, आठवे वेतन आयोग जानेवारी २०२६ महिन्यात कार्यरत होऊ शकतो. प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या हातात पैसे पडण्यासाठी आर्थिक वर्ष २०२७ उजाडू शकते असा तज्ञांचा कयास आहे. जर मंजूरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांचे तसेच पेंशनरच,निवृत्ती वेतन ३०%,४० वाढू शकते. ज्याच्यामुळे त्यामुळे सरकारवर एकूण १.०८ लाख कोटीचा अतिरिक्त बोजा पडला आहे.

निवृत्ती वेतनात वाढ, इतर खर्च, कर्मचाऱ्यांचे पगारवाढ, इतर भत्ते, राहणीमान, महागाई कशा विविध मुद्यांवर विचार करून त्यासंबंधी अंतिम निर्णय घेणे शक्य होणार आहे. फिटमेंट फॅक्टर (Fitment Factory) आधारे यांचे निश्चित मूल्यांकन होणार आहे. सध्या आकडेवारीनुसार, भारतात ४४ लाखांपेक्षा अधिक शासकीय कर्मचाऱ्यांना या कमिशनचा लाभ होणार आहे.



सरकारी कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन कसे मोजतात?

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मूळ वेतन, महागाई भत्ता (डीए), घरभाडे भत्ता (एचआरए) आणि वाहतूक भत्ता यांचा समावेश असतो. कर्मचाऱ्यांचा मूळ पगार त्यांच्या एकूण उत्पन्नाचा केवळ ५१.५ टक्के असतो

 
Comments
Add Comment