संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाका : आमदार खताळ यांची विधानसभेत मागणी

संगमनेर : संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर भूमिगत गटारीच्या साफसफाईचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, आणि हलगर्जीपणामुळे अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी या दोघांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधान सभेत केली.


या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अतुल पवार याच्या कुटुंबीयांना शासनाकडून नियमा नुसार ३० लाख रुपये आर्थिक मदत मिळत आहे. मात्र, रियाज पिंजारी याने जीवाची पर्वा न करता पवारच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना ही शासनाने भरीव स्वरूपात आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.


गटारीतील मैला हाताने साफ करण्यास प्रतिबंध आणि पुनर्वसन करणारा २०१५ चा कायदा अस्तित्वात असतानाही त्या ठेकेदाराने या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत सुरक्षा उपाययोजना पूर्णतः धाब्यावर बसविण्यात आल्या होत्या. चेंबरमधील मैला साफ करण्याचे काम यंत्रसामग्रीच्या साह्याने करणे गरजेचे असताना त्या ठेकेदाराने अतुल पवार यास कोणती ही सुरक्षा उपकरणे न देता त्याला चेंबरमध्ये उतरवले.


चेंबरमधील विषारी वायूमुळे पवार यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला वाचविण्या साठी गेलेला रियाज यालाही जीव गमवावा लागला. या घटनेमुळे या दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर संगमनेर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी, भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे असे आमदार खताळ यांनी विधानसभेत ठामपणे सांगितले.

Comments
Add Comment

तणाव वाढला, तैवान जवळ पोहोचला चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा

तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...! महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात

itel A90 लिमिटेड एडिशन लाँच मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शनसह ७००० रूपयांत लाँच

MIL STD 810H - सह मिलिटरी-ग्रेड टफनेस आणि धूळ, पाणी आणि थेंब प्रतिरोधकतेचे 3P कंपनीकडून आश्वासन परवडणाऱ्या किमतीत

आधी वंदू तुज मोरया...

महाराष्ट्रात आणि देशातही घराघरांत पोहोचलेला आणि आबालवृद्धांचा आराध्य दैवत गणेशोत्सवाची सुरुवात आजपासून

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य: मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई: मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे,