Sunday, August 3, 2025

डोंबिवलीतील रिक्षा चालकाने स्वतः बुजवले रस्त्यातील खड्डे!

डोंबिवलीतील रिक्षा चालकाने स्वतः बुजवले रस्त्यातील खड्डे!

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अवलंबून न राहता एक रिक्षा चालकाने स्वतः परिश्रम करून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम केले. या कामामुळे त्याने पालिकेचे व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता तरी पालिका प्रशासन रस्त्यातील खड्डे बुजविणार का अशी विचारणा नागरिक करीत आहेत.



पालिकेच्या ह प्रभागक्षेत्र अंतर्गत असलेल्या पश्चिम विभागातील अनेक रस्ते खड्डेमय झाल्याने त्रस्त झालेल्या एका रिक्षाचालकाने स्वतः खड्डे बुजविले. रिक्षा चालविताना खड्ड्यामुळे मणक्याचा त्रास, पाठदुखी, कंबरदुखी होत असल्याने अखेर मीच खड्डे बुजविल्याचे त्या संतोष मिरकुटे यांनी सांगितले.


काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील पालिकेच्या 'ह' प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर रिक्षाचालकांनी ठिय्या आंदोलन केले होते. सहायक आयुक्त राजेश सावंत यांच्या आश्वासनानंतर रिक्षाचालकांनी आंदोलन मागे घेतले. डोंबिवली पश्चिमेकडील अनेक रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment