श्रावणाची चाहूल, भाज्यांचे दर कडाडले

  39

टोमॅटो, फ्लॉवरचे भाव दुप्पट, तर कोथिंबिरीचे दर घसरले


पेण(स्वप्नील पाटील) : अवघ्या दोन आठवड्यांवर श्रवण महिना आला असल्याने पेणच्या घाऊक बाजारात भाज्यांचे दर कडाडले आहे. त्यामुळे गृहिणीचे दैनंदिन बजेट कोलमडले आहे. सतत पडत असणारा पाऊस आणि त्यामुळे भाज्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता आवक घटल्याने भाज्यांचे दर जवळपास दुपटीने वाढले आहे. तर कोथिंबीरचे दर काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे बऱ्याच गृहिणी बाजारात गेल्यानंतर आवर्जून कोथिंबीर घेत आहे आणि पावसाळ्यात चहा सोबत गरमागरम कोथिंबीर भजी, कोथिंबीर वड्या करायला पसंती देत आहे. दरम्यान हे वाढलेले दर पाहता श्रवण महिना संपेपर्यंत म्हणजेच किमान एक ते दीड महिना तरी असेच राहतील असा अंदाज भाजी विक्रेते वर्तवित आहेत.


पावसाळा सुरू झाला की या दरम्यान येणाऱ्या रानभाज्या अजून तरी पाहिजे तशा आल्या नाहीत, त्यामुळे अनेक नागरिक दैनंदिन भाज्यांचा सर्रास वापर करत आहेत. त्यातच पाऊस सुरू झाला असल्याने भाज्यांचे नुकसान होत आहे. साहजिकच हे नुकसान होत असल्याने भाज्यांची मागणी तीच मात्र पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने हे भाज्यांचे दर वाढले असल्याचे भाजी विक्रेते सांगत आहेत.



भाज्यांचे एक किलोमागे किरकोळ दर


टोमॅटो ४० रुपये, फ्लॉवर १२० रुपये, कोबी ५० रुपये, मिरची ८० रुपये, दुधी ६० रुपये, शेवगा १२० रुपये, शिमला १२० रुपये, आलं ८० रुपये, तोंडली १२० रुपये, शिराळे १२० रुपये, कारले १२०रुपये, वांगी ८० रुपये, गवार १२० रुपये.


पावसाळा सुरू झाला की बाजारात रानभाज्या येतात, मात्र अजून तरी हव्या तशा या भाज्या आल्या नसल्याने दररोज बाजारात उपलब्ध असणाऱ्या भाज्यांकडे आमचा कल आहे. परतू मागणीनुसार पुरवठा कमी असल्याने भाज्यांचे दर वाढले आहे. त्यामुळे आमचे बजेट कोलमडले आहे. नीलम म्हात्रे, गृहिणी

Comments
Add Comment

Jan Surksha Bill : कोणाचाही आंदोलनाचा अधिकार काढलेला नाही, फक्त संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांना… जनसुरक्षा विधेयकाबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुंबई : जनसुरक्षा विधेयक हे विधासभेमध्ये काल मंजूर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत

दहीहंडी, गणेशोत्सव परवानगीकरिता ऑनलाइन सुविधा

प्रत्येक प्रभागात एक खिडकी कक्ष स्थापन विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका क्षेत्रात सार्वजनिक दहीहंडी

गणपतीपुळे मंदिरात लवकरच होणार ड्रेसकोड लागू

रत्नागिरी (वार्ताहर): महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रत्नागिरी

कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू

केडीएमसी क्षेत्रात नागरी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर कल्याण (प्रतिनिधी): कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात

Power Cut: कल्याण-डोंबिवली, अंबरनाथमध्ये अनिश्चित काळासाठी वीजपुरवठा खंडित! महावितरणकडून महत्त्वाची अपडेट

भिवंडी-पडघा येथील 220 केवी सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड कल्याण: कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या उपनगरांमधील

Jansurksha Bill : जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई: बहुचर्चित 'राज्य जनसुरक्षा विधेयक' अखेर आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं आहे. शहरी नक्षलवाद