Saturday, October 25, 2025
Happy Diwali

शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात झालं काय ? चर्चेला उधाण

शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात झालं काय ? चर्चेला उधाण
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा दौरा केला. शिंदे बुधवारच्या रात्रीपासूनच दिल्लीत आहेत. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत नियोजनाच्यादृष्टीने एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याशी काही मुद्यांवर चर्चा केल्याचे वृत्त आहे. दिवाळीनंतर मुंबई महापालिका तसेच राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकदम होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी करायच्या नियोजनाबाबत एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात सविस्तर चर्चा झाली. उद्धव आणि राज युती करणार की नाही आणि युती झाली तर त्याचा काय परिणाम होईल याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. काही खासगी संस्थांच्या सर्व्हेचे रिपोर्ट घेऊन शिंदेंनी अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. मागील काही दिवसांत शिवसेनेच्या आमदारांच्या वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे नवनवे वाद निर्माण झाले. हे वाद मिटवावे आणि भविष्यात नवे वाद होऊ नये यासाठी घ्यायच्या काळजीबाबतही एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा