बोरिवली ते गोराई जलप्रवास १५ मिनिटांत होणार

  97

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रो-रो जेट्टीचे झाले भूमिपूजन


मुंबई : बोरिवली येथील रो-रो जेट्टी फेज १ चे भूमिपूजन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. या जेट्टीमुळे बोरिवली येथे येणाऱ्या पर्यटकांना तसेच स्थानिकांना जलमार्गाने सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. यापूर्वी या प्रवासाला एक तास तीस मिनिटे एवढा वेळ लागत होता. पण रो-रो जेट्टीमुळे हा प्रवास केवळ पंधरा मिनिटांत पूर्ण होणार असल्याची ग्वाही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिली. तसेच या जेट्टीचे काम वेळेत पूर्ण करून ही रो-रो सेवा नागरिकांच्या सेवेत लवकरच कार्यान्वित केली जाईल असेही यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले. यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार संजय उपाध्याय, भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांसह स्थानिक नागरिक व कोळी बांधव उपस्थित होते.



बोरिवली येथील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा तसेच स्थानिक प्रवासाला गती मिळावी यासाठी बोरिवली फेज १ रो-रो जेट्टी सेवेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला उपक्रमांतर्गत हा महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या जेट्टीचे भूमिपूजन शुक्रवार ११ जुलै २०२५ रोजी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, भाजपा सरकारच्या कार्यकाळात ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन होते, त्या कामांचे लोकार्पण देखील होते.

बोरीवली रो-रो प्रकल्पासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ज्या प्रवासाला यापूर्वी एक तास तीस मिनिटे लागत होती तो प्रवास आता पंधरा मिनिटांत पूर्ण होणार आहे. जशी मुंबई मध्ये मेट्रो सेवा आहे, त्याचप्रमाणे मुंबईच्या MMR भागात वॉटर मेट्रो सेवा देखील सुरू व्हावी असा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून काम सुरु आहे, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत

टेस्ला मुंबईत पहिले चार्जिंग स्टेशन सुरू करणार!

मुंबई : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्लाने घोषणा केली आहे की, त्यांचे भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन

जुहू बीचवर २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, थरकाप उडवणारे १४ तास!

मुंबई : जुहूच्या सिल्वर बीचवर गोदरेज गेटजवळ समुद्रात वाहून गेलेल्या दोन तरुणांपैकी, विघ्नेश मुर्गेश देवेंद्रम