पुण्यात उबाठा, मनसेला खिंडार! प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

ठाणे: पुण्यातील उबाठा आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव राम रेपाळे आदी उपस्थित होते.

आज पुण्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ, क्रीडा क्षेत्रातील उमेश गालिंदे, कोंढाव्यातील मनसेचे माजी पदाधिकारी सतिश शिंदे, पुणे शहरातील अभिमन्यू मैद, आरोग्यदूत गणेशोत्सव मंडळाचे सुधीर ढमाले, गोरक्षक निलेश जाधव, संदेश पावसकर, अथर्व पिसाळ, विजय गालफाडे, अनिल बटाणे, महेश चव्हाण, महेश सुर्यवंशी, देवेंद्र शेळके, गोरख बांदल, गौरव नवले, अनिकेत उतेकर, ओकांर मालुसरे, योगेश राजगुरु, कॅन्सर योद्धा युनुस सय्यद यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने पुण्यात शिवसेनेला बळ मिळाले असून उबाठा आणि मनसेला खिंडार पडले आहे.
Comments
Add Comment

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने