Friday, August 29, 2025

पुण्यात उबाठा, मनसेला खिंडार! प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

पुण्यात उबाठा, मनसेला खिंडार! प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
ठाणे: पुण्यातील उबाठा आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव राम रेपाळे आदी उपस्थित होते. आज पुण्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ, क्रीडा क्षेत्रातील उमेश गालिंदे, कोंढाव्यातील मनसेचे माजी पदाधिकारी सतिश शिंदे, पुणे शहरातील अभिमन्यू मैद, आरोग्यदूत गणेशोत्सव मंडळाचे सुधीर ढमाले, गोरक्षक निलेश जाधव, संदेश पावसकर, अथर्व पिसाळ, विजय गालफाडे, अनिल बटाणे, महेश चव्हाण, महेश सुर्यवंशी, देवेंद्र शेळके, गोरख बांदल, गौरव नवले, अनिकेत उतेकर, ओकांर मालुसरे, योगेश राजगुरु, कॅन्सर योद्धा युनुस सय्यद यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने पुण्यात शिवसेनेला बळ मिळाले असून उबाठा आणि मनसेला खिंडार पडले आहे.
Comments
Add Comment