Friday, July 11, 2025

मानखुर्द महामार्गालगतच्या रहिवाशांचे SRA मार्फत सर्वेक्षण करून पुनर्वसन करावे

मानखुर्द महामार्गालगतच्या रहिवाशांचे SRA मार्फत सर्वेक्षण करून पुनर्वसन करावे

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश


मुंबई:  सायन- पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील विशेष राज्य महामार्ग आहे. यामध्ये मानखुर्द परिसरात सदर महामार्गाच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बांधकाम करून नागरिक राहत आहेत. त्या जमिनीचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) च्या मार्फत सर्वेक्षण करून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिले.

सह्याद्री मित्र मंडळ चाळ कमिटी, महात्मा फुले नगर (शिंदेवाडी), यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय महामार्ग, मानखुर्द, मुंबई येथील रहिवाशांच्या समस्यांबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री,शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या विधानभवनातील दालनात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी या बैठकीस आमदार सना मलिक शेख , सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) संजय दशपुते , अवर सचिव सुधीर शिंगाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भोसले यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील विशेष राज्य महामार्ग मानखुर्द परिसरातून जातो. या महामार्गाच्या हद्दीत अनेक अनधिकृत झोपड्या, गाळे व बांधकामे आढळली होती. सुरक्षेच्या कारणास्तव ही अतिक्रमणे निष्काषित करण्यात आली आहेत.

गरीब आणि विस्थापित झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा, या दृष्टीने या जागेचे सर्वेक्षण करुन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत पुनर्वसनाची प्रक्रिया शासनाच्या धोरणानुसार सुरू करण्यात यावी," असे मंत्री भोसले यांनी सांगितले
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >