
मुंबई : मुंबईच्या बेस्ट उपक्रमामध्ये भाडेतत्वावर ६,५५५ बसेस घेण्यासाठी विविध पुरवठादारांसोबत करार केला आहे. त्यापैकी २,१६७ बसेस बेस्ट उपक्रमाच्या सेवेत दाखल झाल्या असून उर्वरित बसेससाठी त्यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. येत्या ४ ते ५ वर्षात बेस्टच्या ताफ्यात किमान १० हजार बसेसची भर घालण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे.

गांधीनगर : वडोदरा आणि आणंदला जोडणाऱ्या ४० वर्षे जुन्या गंभीरा पुलाचा काही भाग महिसागर नदीत कोसळल्याने आतापर्यंत १७ जणांचा बळी गेला आहे, ज्यात एकाच ...
मुंबईत बेस्ट बसेसची संख्या वाढविण्याबाबत आमदार राजेश राठोड, सतेज ऊर्फ बंटी पाटील, भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न विचारला आहे. आयुर्मान संपुष्टात आलेल्या २,१६० बसेस मागील पाच वर्षात बेस्टने भंगारात काढल्या. तर, केवळ ३७ नव्या गाड्यांची खरेदी केली. मुंबईतील प्रवाशांना ३,३३७ बेस्ट बसेसची आवश्यकता आहे. कमी बसेसमुळे नागरिकांना गर्दी व बसच्या दीर्घकाळ प्रतिक्षेचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची समस्या कमी करण्यासाठी बेस्ट बसच्या ताफ्यात अधिक बसेस समाविष्ट करण्यासाठी काय कार्यवाही केली आहे, असा प्रश्न केला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बेस्टच्या बस ताफ्यातील बहुतांश बसेसचे आयुर्मान संपल्यामुळे निष्कासित केल्या आहेत. परंतु, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भाडेतत्वावर बसगाड्या घेतल्या आहेत. बस पुरवठादार कंपन्यांकडून प्राप्त होणाऱ्या बसगाड्यांची संख्या अपुरी असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येला अनुसरून बसगाड्या प्रवर्तित करण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे पुरवठादारांना उर्वरित बसेस लवकर पुरवण्यास सांगण्यात आले आहे, असे लेखी उत्तरात म्हटले आहे.