Friday, July 11, 2025

आता वेळेत पूर्ण होणार मुंबई मेट्रोची कामे

आता वेळेत पूर्ण होणार मुंबई मेट्रोची कामे

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पांचा विस्तार झपाट्याने सुरू आहे. एमएमआरडीए हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी आता कामाचा वेग वाढवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. एमएमआरडीएने कामगारांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रोच्या मुख्य मार्गावर जास्त कामगार तैनात करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे मेट्रोच्या कामात गती येणार आहे. मुंबईकरांना लवकरच नवीन मेट्रोसेवा वापरता येईल. या मार्गिकांच्या कामाला गती मिळावी यासाठी मनुष्यबळात वाढ करण्यात आली असून एमएमआरडीएने मनुष्यबळ धोरण ब्लागू केले आहे. याचा सकारात्मक परिणाम होत असून 'मेट्रो २ व' अंधेरी पश्चिम ते मंडाले), 'मेट्रो ४', 'मेट्रो ४ अ' (वडाळा ठाणे कासारवडवली गायमुख) आणि मेट्रो ९' (दहिसर ते मिरा-भाईंदर) मार्गिकांच्या कामातील मनुष्यबळात २७ ते ३७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गिकांच्या कामाला गती आली आहे.


मेट्रो लाईन ४ वर कापुरबावडी स्थानकाजवळ एका रात्रीत ८ 'यू' गर्डर बसवण्यात आले. हे काम फक्त ८ तासांत पूर्ण झाले. प्रत्येक गर्डरचे वजन सुमारे ९८ टन होते. ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. या कामामुळे मेट्रो लाईन ४ लवकरच मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएने अलीकडे १२ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले आहेत. यामध्ये मेट्रो लाईन ४, ४ए आणि ६ यांचा समावेश आहे. लाईन ४ साठी एल अँड टी बरोबर मोठा करार करण्यात आला आहे. ४,७८८ कोटींची कामे त्यांना देण्यात आली आहेत. याशिवाय स्वयंचलित भाडे संकलन प्रणालीसाठी २४९ कोटींचा करार झाला आहे. यामुळे मेट्रो प्रकल्पांना गती मिळणार आहे. यासह एमएमआरडीएने चार नवीन फुटओव्हर ब्रिज बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हे ब्रिज मेट्रो स्टेशनशी थेट जोडले जातील. यामुळे प्रवाशांना स्टेशनपर्यंत पोहोचणे सोपे होईल. ही सुविधा पंत नगर, विक्रोळ, भांडुप आणि विजय गार्डन येथे असेल.


मनुष्यबळ धोरणानुसार २५ ते ५० टक्के मनुष्यबळ कमी असल्यास कंत्राटदारांना प्रतिदिन एक लाख रुपये दंड आकारण्यात येतो, तर ५० टक्क्यांहून अधिक मनुष्यबळ कमी असल्यास प्रतिदिन २ लाख रुपये दंड आकारणी आहे. हे धोरण लागू झाल्यानंतर 'मेट्रो २ चं', 'मेट्रो ४', 'मेट्रो ४अ' आणि मेट्रो ९' मार्गिकांवरील कामगारांच्या संख्येत १७ ते ३७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 'मेट्रो ४' मार्गिकतील कंत्राटदारांन ओडिशामधून ६० कामगार बोलवले आहेत. तर येत्या आठवड्यात उत्तर प्रदेशातून आण खी १५० कामगार प्रकल्पस्थळी दाखल होणार आहेत. कामगारांची संख्या वाढत असल्याने मेट्रोच्या कामांना गती मिळणार असून कामे निर्धारित वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास एमएमआरडीएला आहे. दरम्यान, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सर्व प्रकल्पस्थळांवर, कामगारांच्या संख्येवर लक्ष ठेवले आहे, नियमित आढावाही घेण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >