
मुंबई : महायुतीचे मंत्री संजय शिरसाट यांच्या एका व्हायरल व्हिडिओने सगळीकडेच खळबळ माजली आहे. नुकतीच मंत्री संजय शिरसाठ यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. यानंतर आता संजय शिरसाट यांचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडीओ दाखवला आहे. या व्हिडीओत संजय शिरसाट यांच्याकडे असलेल्या बॅगेत नोटांचे बंडल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

अहिल्यानगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातचं होणार असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. राज्य सरकारने अहिल्यानगर ...
व्हिडीओवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
संजय शिरसाट याबाबत बोलताना म्हणाले, मी आत्ताच तुमच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे. तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे. माझं बेडरूम आहे. बेडरूममध्ये मी बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे. एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावाही संजय शिरसाट यांनी केलाय.
संजय राऊत ठरल्याप्रमाणे भूंकतात
संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊतांनी आज ठरल्याप्रमाणे भुंकण्याचा काम केले. शिंदे साहेब दिल्लीला अमित शाह साहेबाला भेटले व त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा. परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळं पाहिलं, तर यांना संताजी-धनाजी दिसतात का? असा प्रश्न आहे. मुर्खासारखे स्टेटमेंट दिसतात. सकाळी उठलं का एकनाथ शिंदे, दुपारी उठलं का एकनाथ शिंदे, मेळावा असला की एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे ..एवढचं संजय राऊत यांचं चालू आहे. गेलेली सत्ता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. असं संजय शिरसाठ म्हणत होते.