
मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुपचूप दिल्ली दौरा करून आले. शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचं पाहायला मिळतंय, या दिल्लीवारीमध्ये एकनाथ शिंदे यांनी अनेक बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती समोर आली, त्यांच्या या दिल्लीवारीवरती खासदार संजय राऊत यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले, तर शिंदे हे त्यांच्या गुरूला म्हणजेच अमित शाहांच्या भेटीसाठी गेल्याचंही त्यांनी म्हटलं त्यावरती शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राऊतांच्या टीकेली उत्तर देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय आहे? 'मुख्यमंत्री व्हायला कुवत आणि धमक लागते'. संजय राऊत यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही, असं म्हटलं, तर आता दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
संजय राऊतांना सामनाचा पगार मिळत नाही
एकनाथ शिंदेवर केलेल्या टीकेवर उत्तर देताना म्हस्के म्हणाले, संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांच्या घशाखाली अन्न ही जात नाही आणि त्यांना सामनाचा पगार मिळत नाही .आता तर ते भुंकत आहेत. पत्रकारांनी सांभाळून रोज त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला जातात ते लोकांना चावायला जातील. लवकरच त्यांना आमच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागेल. काल एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये होते, सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे. सीनियर कौन्सिलला ते भेटायला गेले होते. त्यांच्यासोबत वकील देखील होते, एकनाथ शिंदे पक्षाचे मुख्य नेते आहेत, त्यामुळे चर्चा करायला गेले होते. संजय राऊत खोटारडा माणूस आहे. ते माकड चाळे ज्या पद्धतीने करतात त्यांना माकड म्हणणं सुद्धा माकडाचा अपमान करणे आहे. अमित शहा दिल्लीत नव्हते, त्यांची भेट देखील झाली नाही त्यांची भेट देखील झाली नाही, राजनाथ सिंह यांचा वाढदिवस असल्यामुळे एकनाथ शिंदे त्यांना भेटले अन् शुभेच्छा दिल्या, असंही नरेश म्हस्के पुढे म्हणालेत.
सोनिया गांधी यांच्या पाया पडायला जातात का?
ते जेव्हा दिल्लीत असतात, तेव्हा गटनेत्यांच्या बैठकीला देखील जात नाही, तेव्हा आम्ही असं म्हणू का? सोनिया गांधी यांच्या घरची भांडी घासायला राहुल गांधी यांच्या घरात झाडू मारण्याकरता गेले होते हे, आम्ही म्हणायचे का? संजय राऊत हा वेडा माणूस आहे. आता ते भुंकत आहेत, थोड्या दिवसांनी ते चावायला लागतील. ते दिल्लीत जेव्हा जातात तेव्हा सोनिया गांधी यांच्या पाया पडायला जातात का? पाय धुवून पाणी प्यायला जातात का? याचे उत्तर द्यावे. काँग्रेसला तुम्ही बाजूला केलं, युज अँड थ्रो केलं, आता तुम्हाला इतर लोक पाहिजे आहे. त्यांच्या पक्षाची वाट लावली आता दुसऱ्या पक्षाची वाट लावायला निघाले आहे. अशा भंकस माणसावरती प्रतिक्रिया देणे उचित वाटत नाही. लोकांमध्ये सहनभूती निर्माण करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा हा पक्ष आहे. त्यांच्या आशीर्वादाने पुढे आम्हाला चालवण्यासाठी संधी मिळाली आहे. त्याच सोनं पुढे करणार आहोत. बाळासाहेब आणि शिवसेनेचे विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले त्यांनी आम्हाला पक्षासाठीचं प्रेम शिकवू नये, लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे, असंही पुढे नरेश म्हस्के म्हणालेत.

मुंबई : राज्यात काही काळाआधी मशिदींवरील भोंग्यांवरून मोठं राजकारण पेटलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला अल्टिमेटम देत मशिदीवरील ...
संजय राऊत भुंकत असतात
संजय राऊत काय बोलतात यावर आमचा पक्ष चालत नाही. संजय राऊत भुंकत आहेच, पुढे ते लोकांना चावतील हे वाचाळवीर आहेत, काहीही बरगळत असतील त्यांच्यावरती काय विश्वास ठेवत आहात. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे, अमित शहा यांची भेट झाली नाही हे मी खात्रीलायक सांगत आहे. संजय राऊत यांनी तारखा दिल्या होत्या सरकार पडणार म्हणून, तेव्हा पडलं का सरकार? यांच्या या बालिश बडबडीवर भुंकण्यावरती का विश्वास ठेवत आहात, मीडियामध्ये राहण्यासाठी हा पॉलिटिकल स्टंट आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं वाटोळे केलं, ते चर्चेत राहण्यासाठी हे सर्व करत आहेत, अशी टीकाही नरेश म्हस्केंनी केली आहे.
उदय सामंत काय म्हणाले?
उदय सामंत म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय आहे. मुख्यमंत्री व्हायला कुवत आणि धमक लागते. संजय राऊत यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्याने त्यांना जखम झाली. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची जखम आणखी वाढली. एकनाथ शिंदे यांना वारंवार टीका करून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांच्या टीकेचा एकनाथ शिंदे यांना काही फरक पडत नाही. एकनाथ शिंदे हे हत्तीसारखे चालतात आणि विरोधक केवळ त्यांच्यावरती भुकांयची काम करतात, असंही विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.