पुण्याच्या गुडलक कॅफेत 'बन मस्का'मध्ये आढळले काचेचे तुकडे

पुणे: पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील (FC Road) गुड लक कॅफे एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आला आहे. आकाश जलगी नावाच्या एका ग्राहकाने दावा केला आहे की, कॅफेत त्यांना सर्व्ह करण्यात आलेल्या बन मस्कामध्ये काचेचे तुकडे आढळले आहेत. या घटनेनंतर त्यांनी तात्काळ व्हिडिओ बनवला आणि कॅफे कर्मचाऱ्यांना जाब विचारला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


नेमकं काय घडलं?


आकाश जलगी आपल्या पत्नीसोबत गुड लक कॅफेमध्ये चहा आणि बन मस्का घेण्यासाठी गेले होते. त्यांना दिलेल्या बन मस्कामध्ये सुरुवातीला बर्फासारखे काहीतरी दिसले. मात्र, नीट पाहिल्यावर 'बन मस्का'मध्ये बर्फ नसून काचेचे तुकडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे आकाश यांचा पारा चढला आणि त्यांनी पत्नीला चहा न पिण्यास सांगत कॅफे कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. कॅफे व्यवस्थापनाने या घटनेबद्दल माफी मागितली आणि बिल घेतले नाही.


आकाश जलगी यांचे म्हणणे आहे की, जर हे काचेचे तुकडे पोटात गेले असते, तर मोठा अनर्थ घडला असता. त्यांनी याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन (FDA) कडे ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. कॅफे मालकांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, ते बन बाहेरून (outsource) मागवतात आणि संबंधित व्यक्तीला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून गुड लक कॅफे हे पुण्यातील एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय ठिकाण आहे, जिथे खवय्ये आवर्जून बन मस्काचा आस्वाद घेण्यासाठी येतात. मात्र, या घटनेमुळे कॅफेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून, स्वच्छतेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून गदारोळ;महाविकास आघाडीच्या काळात अधिवेशन फक्त पाच दिवसाचं होतं !!तेही मुंबईतच

नागपूर: नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अधिवेशनाचा कालावधी

तुकडा बंदी कायद्यातील सुधारणेसाठी विधेयक विधानसभेत सादर

नागपूर: आजपासून सुरू झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकारणात एक

Pune Press Club : पुणे प्रेस क्लबसाठी सेनापती बापट मार्गावर प्रशस्त जागा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय!

* महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार * आठ हजार चौ.फुटावर सुसज्ज इमारत उभारणार नागपूर : पुणे पत्रकार

मिलिंद साठे राज्याचे नवे महाधिवक्ता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूर : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांच्या

Baba Aadhav | ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढावांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात दाखल

पुणे : श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती

'इंडिगो'वर कारवाई होणारच; मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विधान

पुणे : इंडिगो एअरलाईन्सने घातलेल्या गोंधळामुळे प्रवाशांना तब्बल सहा दिवसांपासून तिष्ठत ठेवले आहे. विमानतळावर