
अहिल्यानगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातचं होणार असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. हे महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच व्हावे, या मागणीसाठी गुरुवारी ( १० जुलै) आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी करून आमदार जगताप यांना आश्वासन दिले.

मुंबई : नितेश राणे यांच्या हस्ते ‘बोरीवली रो-रो जेट्टी (फेज १)’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन आज सकाळी (११ जुलै) झाले. यावेळी बोलताना भाजप ...
यावेळी दिलेल्या निवेदनात जगताप यांनी म्हटले आहे, की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. हे महाविद्यालय शहरातील मध्यवर्ती ठिकाणी होणे गरजेचे आहे. जेणेकरुन शहरातील सर्व नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सोयीचे होईल. या महाविद्यालयासाठी अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या नालेगाव परिसरातील कृषी विभागाची २५ एकर जमीन उपलब्ध आहे. सध्या ही जागा वापरात नाही. त्या जागी जर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यास सर्व नागरिकांची चांगली सोय होईल. अहिल्यानगर जिल्ह्यासह सोलापूर, पुणे व मनमाड जिल्ह्यांना जोडणारा हा मध्यवर्ती भाग आहे. त्यामुळे हे महाविद्यालय शहरातच व्हावे, अशी मागणी जगताप यांनी केली होती. आता मुख्यमंत्र्यांशी हे महाविद्यालय शहरातच होईल, अशी घोषणा केली आहे.