दूषित आहार पुरवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत घाला, कठोर कारवाई करा, विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

धाराशिवमध्ये पोषण आहारात अळ्या सापडल्या प्रकरणी वडेट्टीवार आक्रमक


मुंबई: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळेत मिलेट बार देण्यात येतात, धाराशिव तालुक्यातील पाच शाळांमध्ये या बार मध्ये अळ्या सापडल्या. दोन दिवस हा प्रकार घडला हे गंभीर आहे. मुलांच्या जीवाशी हे खेळणे आहे. FDA ने तपासणी न करता याचा पुरवठा झाला कसा असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

पनवेल इथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यामध्ये गर्भवती माता आणि लहान बालकांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट आहे. आहाराचे पाकीट उघडताच त्यात घाण वास येते त्यात मुंग्या असतात. असा पोषण आहार घरी न आणलेला बरा असे लाभार्थीना वाटते.त्यामुळे पोषण आहारात असा भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांना कारवाई करण्यात यावी.त्यांना काळया यादीत टाकावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

यावर विधानसभा अध्यक्ष यांनी शासनाने नोंद घेऊन कारवाई करू असे निर्देश दिले.
Comments
Add Comment

तणाव वाढला, तैवान जवळ पोहोचला चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा

तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला

ठाणे पोलिसांनी ज्येष्ठांसाठी विकसित केला ‘आधारवड’ मोबाइल अॅप

ठाणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या

सुबोध भावे साकारणार निम करोली बाबा

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी झेप घेत आहे. तो लवकरच येणाऱ्या

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...! महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात

सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित