Friday, July 11, 2025

Bitcoin marathi news: FII कडून मागणीत वाढीमुळे बिटकॉइन रचला नवा इतिहास आतापर्यंत शुक्रवारी झालेली 'ही' सर्वात मोठी वाढ

Bitcoin marathi news: FII कडून मागणीत वाढीमुळे बिटकॉइन रचला नवा इतिहास आतापर्यंत शुक्रवारी झालेली 'ही' सर्वात मोठी वाढ
प्रतिनिधी: आज शुक्रवारी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) मागणी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या मैत्रीपूर्ण धोरणांमुळे बिटकॉइनने सर्वकालीन नवा उच्चांक गाठला आहे. प्रामुख्याने बदललेले बिटकॉइनचे अर्थकारण यामुळे जगभरात बीबिटकॉइला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. एका रूपया बदल्यात बिटकॉइनचा किंमतीत १.६८% वाढ आज झाली. परिणामी बिटकॉइन (Bitcoin) एका बिटकॉइनची किंमत १०१०३१२५.६९ रूपयांवर पोहोचली आहे. २४ तासांपूर्वीचा किंमतीत ४.३९% एवढ्या मोठ्या संख्येने वाढ बिटकॉइनमध्ये झाली.

जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी शुक्रवारी आशियाई सत्रात ११६,७८१.१० डॉलरच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली आहे ज्यामुळे वर्षभरातील करन्सीत नफा २४% पेक्षा जास्त झाला. मार्चमध्ये, ट्रम्पने क्रिप्टोकरन्सीचा धोरणात्मक राखीव निधी स्थापित करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. ज्यातून या धोरणात अनुकुलता निर्माण झाल्यासह त्यांनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन प्रतिनिधी पॉल अ‍ॅटकिन्स आणि व्हाईट हाऊस आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रमुख झार डेव्हिड सॅक्स यांच्यासह अनेक क्रिप्टो-फ्रेंडली व्यक्तींची नियुक्ती देखील केली आहे.

ट्रम्पच्या कुटुंबाच्या व्यवसायांनी देखील क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रवेश केला आहे. ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप बिटकॉइनसह अनेक क्रिप्टो टोकन्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक्सचेंज-ट्रेडेड फंड सुरू करण्याचा विचार करत आहे, असे मंगळवारी एसईसी (SEC) फाइलिंगमध्ये दिसून आले आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी, इथर, त्याचप्रमाणे ५% पेक्षा जास्त वाढून २,९९८.४१ डॉलरवर पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. यापूर्वी इथरने २९६४.०२ डॉलरवर झेप घेतली होती.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >