Thursday, July 10, 2025

लेहमधील भूस्खलनात अडकले महाडचे पर्यटक

लेहमधील भूस्खलनात अडकले महाडचे पर्यटक

महाड : लेह-मनाली भूस्खलनात दरड कोसळल्याने अनेक प्रवासी येथे अडकले. महाड शहरातील पर्यटकांचाही यात समावेश आहे. यामध्ये अमोल महामुणकर, समीर सावंत व राजेंद्र दरेकर आणि त्यांचे कुटुंब असे एकूण ९ जण गेल्या दोन दिवसांपासून येथील थंडीत अडकले आहे. दोन दिवस कडाक्याच्या थंडीत अन्न, पाणी, निवारा यापासून वंचित राहिल्याने प्रशासनाकडून अन्न, पाणी आिण निवाऱ्याची सोय करावी अशी मागणी होत आहे. सध्या तापमान २ डिग्री सेल्सियसपर्यंत आहे. दरड हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र सतत दरड कोसळत असल्यामुळे मार्ग मोकळा होण्याचा निश्चित अंदाज येत नसल्याचे अमोल म्हामुणकर यांनी सांगितले. प्रशासनाकडून गरम कपड्यांची मदत पोहोचवावी अशी मागणी होत आहे. दरम्यान आज दुपारनंतर अमोल म्हामुणकर यांच्याशी संपर्क झाला असता या कुटुंबीयांची या मार्गावरून सुटका होऊन ते सुरक्षित स्थळी पोहोचल्याचे सांगितले.

Comments
Add Comment