Thursday, July 10, 2025

तालुकानिहाय सरपंचपदाची आरक्षण अधिसूचना जारी

तालुकानिहाय सरपंचपदाची आरक्षण अधिसूचना जारी

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सन २०२५-२०३० साठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करून अधिसुचना राजपत्राद्वारे प्रसिद्ध झाली. त्यानुसार तालुकानिहाय सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करुन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी केली.


अलिबाग : ग्रामपंचायत संख्या ६२, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५, महिला ६, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ९, महिला ८, सर्वसाधारण जागा-खुला १७, महिला १६.


मुरुड : ग्रामपंचायत संख्या २४, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ३, महिला २, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला ३, महिला ४, सर्वसाधारण जागा-खुला ६, महिला ५.


पेण : ग्रामपंचायत संख्या ६४, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ७, महिला ७, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला , महिला ९, सर्वसाधारण जागा-खुला १६, महिला १६.


पनवेल: ग्रामपंचायत संख्या ७१, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला २, महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५, महिला ६, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला, महिला १०, सर्वसाधारण जागा-खुला २०


उरण : ग्रामपंचायत संख्या ३५, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला २, महिला १, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ४, महिला ५, सर्वसाधारण जागा-खुला ११, महिला ११.


कर्जत : ग्रामपंचायत संख्या ५५, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित ८, महिला ८, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ८, महिला ७, सर्वसाधारण जागा-खुला १०, महिला १२.


खालापूर : ग्रामपंचायत संख्या ४५, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५, महिला ५, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ६, महिला ६, सर्वसाधारण जागा-खुला ११, महिला १०.


रोहा : ग्रामपंचायत संख्या ६४, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला २, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५, महिला ५, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ९, महिला ८, सर्वसाधारण जागा-खुला १७, महिला १७.


सुधागड : ग्रामपंचायत संख्या ३३, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५, महिला ६, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ४, महिला ५, सर्वसाधारण जागा खुला ७, महिला ५.


माणगाव : ग्रामपंचायत संख्या ७४, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला २, महिला २, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ३, महिला ४, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला १०, महिला १०, सर्वसाधारण जागा खुला २२, महिला २१.


तळा: ग्रामपंचायत संख्या २५, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित २, महिला २, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ४, महिला ३, सर्वसाधारण जागा-खुला ५, महिला ७.


महाड : ग्रामपंचायत संख्या १३४, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला ३, महिला ३, अनुसूचित जमाती आरक्षित ५, महिला ४, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला १८, महिला १८, सर्वसाधारण जागा खुला ४१, महिला ४२.


पोलादपूर : ग्रामपंचायत संख्या ४२, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला २, अनुसूचित जमाती २, महिला १, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ५, महिला ६, सर्वसाधारण जागा-खुला १३, महिला १२.


श्रीवर्धन तालुका : ग्रामपंचायत संख्या ४३, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ३, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ६, महिला ६, सर्वसाधारण जागा खुला ११, महिला १३.


म्हसळा तालुका : ग्रामपंचायत संख्या ३९, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला १, अनुसूचित २, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ६, महिला ५, सर्वसाधारण जागा-खुला १०.


रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत संख्या ८१०, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १६, महिला १७, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ६२, महिला ६२, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला १०९, महिला ११०, सर्वसाधारण जागा खुला २१७, महिला २१७.
Comments
Add Comment