
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात घसरणच झाली आहे. सकाळी गिफ्ट निफ्टीतील घसरणीनंतर बाजारात दुर्दशा झाली होती. फंडामेंटल चांगले असूनही अस्थिरतेत वाढ झाल्याने निर्देशांकात नकारात्मक पातळी निर्माण झाली होती. अंतिम सत्रात तोच पवित्रा बाजाराने कायम राखला आहे. सेन्सेक्स ३४५.८० अंकाने घसरत ८३१९०.२७ पातळीवर स्थिरा वला आहे. निफ्टी ५० निर्देशांक १२०.८५ अंकाने घसरत २५३५५.२५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २१७.९४ अंकांची घसरण झाल्याने निर्देशांक पातळी ६३७५१.२१ पातळीवर पोहोचला. बँक निफ्टी निर्देशांकात २४७.०५ अंकाने घसरत निर्देशांक ५६९६६.५० पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्स मिडकॅपमध्ये ०.३१% घसरण झाली व स्मॉलकॅपमध्ये ०.०९% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅपमध्ये ०.३०% व स्मॉलकॅपमध्ये ०.२७% घसरण झाली आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) बहुतांश समभागात घसरण झाली आहे. सर्वाधिक वाढ मेटल (०.४२%), रिअल्टी (०.७२%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.११%) समभागात झाली. तर सर्वाधिक घसरण फार्मा (०.५९%), एफएमसीजी (०.५७%), पीएसयु बँक (०.८०%), खाजगी बँक (०.४८%), आयटी (०.७९%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.७४%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.४२%) समभागात झाली आहे. आज अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) २.२४% घसरल्याने बाजारात मोठी चढउतार झाली आहे. बाजारातील सपोर्ट लेवलला धक्का लावण्यात आज बँक, फायनांशियल सर्विसेस, वीआयएक्स या निर्देशांकाने लावला. प्रामुख्याने बाजारातील अस्थिरता पाहता गुंतवणूकदारांनी आज नकारात्मक कल दिला आहे. मोठ्या प्रमाणात आज परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार व किरकोळ घरगुती गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता आहे. प्रामुख्याने बँक समभागात झालेल्या घसरणीमुळे पुन्हा एकदा आगामी तिमाही निकालांवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.
आज बीएसईत (BSE) ४१६१ समभागापैकी १९६१ समभागात वाढ झाली तर २०६२ समभागात घसरण झाली. एनएसईत (NSE) मध्ये २९९८ समभागापैकी १३९२ समभागात वाढ झाली तर १५२४ समभागात घसरण झाली. आज विशेषतः निर्देशांकात घट झाली तरी बीएसईत २७२ समभाग, एनएसईत १०१ समभाग (Stocks) आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत. बीएसईचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४६०.१७ कोटी होते तर एनएसईचे बाजार भांडवल ४५८.०५ लाख कोटी रुपये होते.
आयटी समभागांमधील कमकुवतपणा आर्थिक क्षेत्रातील वाढीपेक्षा जास्त होता. त्याचा फटका बाजारात बसला. अमेरिकेसोबतच्या संभाव्य व्यापार कराराच्या वाढत्या अपेक्षेमुळे आणि जून-तिमाहीच्या उत्पन्न हंगामाच्या सुरुवातीमुळे टीसीए स, टाटा इलेकसी त्यांचे निकाल जाहीर करणार असल्याने दिवसभर अस्थिरता कायम राहण्याची अपेक्षा विश्लेषकांना होती नेमके तसेच झाले. निफ्टीत ५० पैकी महत्वाचे ४० समभाग 'लाल' रंगात बंद झाले त्याचा धक्का बाजारात बसला. निफ्टी ५० च्या साप्ताहिक एफ अँड ओ एक्सपायरीमुळेही दिवसाच्या अस्थिरतेत वाढ झाली, ज्यामुळे एकूणच भावना दबावाचा राहिल्या तरीही व्हॉल्यूम वाढले होते.
सेन्सेक्स व निफ्टी सलग दुसऱ्यांदा पडले आहेत. आजच्या निफ्टीत सर्वाधिक फटका भारतीय एअरटेल, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स यांना बसला होता. सलग पाचव्यांदा निफ्टी मिडकॅप १५० पडला आहे. आयटीत कोफोर्ज, इन्फोसिस सम भागात घसरण झाली ज्याचा परिणाम निर्देशांकात दिसला आहे. बँक समभागात सतत चौथ्यांदा घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मेटल आयातीत ५०% शुल्कवाढ लादल्याने बाजारात मेटलमध्ये घसरण सुरू आहे. आज सेन्सेक्समध्ये ८३७४२.२८ इतका 'हाय' होता तर ८३१३४.९७ लो होता. संपूर्ण दिवसांत निफ्टी सेन्सेक्स मध्ये घनघोर अस्थिरता राहिली ज्यामुळे बाजाराचे संतुलन बिघडले होते. आज डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी काही देंशावर टेरिफ वाढीची घोषणा केली मात्र बँक ऑफ कोरियाने रेपो दरात कपात केल्यामुळे आशियाई बाजारातील सुरुवातीच्या कलात संमिश्र प्रतिक्रिया होत्या. बहुतांश समभागात वाढ झाली होती. दिवसाअंतीही निकेयी (०.४४%), सेट कंपोझिट (०.००%) अपवाद वगळता इतर समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ कोसपी (१.५५%), जकार्ता कंपोझिट (०.८८%), हेंगसेंग (०.५७%) समभागात झाली.
आज दिवसभरात सकाळच्या सत्रातली अस्थिरता कायम असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने सोन्याच्या बेस लेवलमध्ये वाढ झाली. परिणामी सोने आज महागले होते. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात ०.४१% वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागणीत वाढ झाल्याने प्रामुख्याने सोन्यात वाढ झाली. कच्च्या तेलाच्या (क्रूड) निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.३१% घसरण झाली आहे. दुपारपर्यंत कच्च्या तेलाच्या निर्देशांकात व किंमतीत मो ठी वाढ झाली होती. रेड सी मध्ये असलेल्या सुरक्षा धोक्यामुळे, रेड सी शिवाय नसलेला वैकल्पिक मार्ग, तेलाला वाढलेली मोठी मागणी या कारणांमुळे तेलाच्या किंमतीत दबाव निर्माण झाला व अचानक ६% तेल वापरात वाढ झाल्याने त्याचा फरक कच्च्या तेलाच्या सपोर्ट लेवलवर दिसला होता. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.३५% घसरण झाली. तर Brent Future निर्देशांकात ०.२३% घसरण झाली होती.
बाजारातील एकूण परिस्थिती पाहता आजच्या बाजारातील युएस दबावाचा वरचष्मा कायम होता. आगामी निकालाशिवाय फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अनिश्चितता पाहता बाजारातील स्थिरता उद्याही कमीच असण्याची शक्यता आहे. भारताचे शिष्टमंडळ आता पुढील आठवड्यात अमेरिकेला भेट देणार आहे. ज्यात वाटाघाटी केली जाईल.दोन्ही देशांकडून अलिकडेच वाटाघाटी सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे दावे केले जात असले तरी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार अद्यापही दृष्टिक्षेपात नाही. पहिल्या तिमाहीच्या निकालांच्या हंगामाची सुरुवात ही गुंतवणूकदारंचा दृष्टीने चिंताजनक बाब आहे. उत्पन्नात सुधारणा होण्याची अपेक्षा असली तरी, एक किंवा दोन तिमाहींनंतरच भौतिक उत्पन्नात वाढ दिसून येईल असे तज्ञांचे म्हणणे होते.
आज बाजारात सर्वाधिक वाढ किर्लोस्कर ऑईल (१०.३७%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (९.१८%), लेमन ट्री हॉटेल (८.२९%), कॅप्रिग्लोबल (५.७१%), ग्लेनमार्क फार्मा (४.६८%), वन ९७ (३.६२%), जेएसबब्लू एनर्जी (३.०४%), कल्याण ज्वेलर्स (१.५५%), पॉवर फायनान्स (२.८०%), लोढा डेव्हलपर (१.५६%), मारूती सुझुकी इंडिया (१.४४%), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (१.३८%), स्विगी (१.१०%), टाटा स्टील (१.०४%), सीजी पॉवर (०.७८%), टाटा मोटर्स (०.४०%), जेल इंडिया (०.३५%), डाबर इंडिया (०.०५%), अदानी पोर्टस (०.०१%) समभागात झाली.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण भारत डायनॅमिक्स (४.६५%), मेट्रोपॉलिस हेल्थकेअर (४.०४%), सोलार इंडस्ट्रीज (३.६२%), झेन टेक्नॉलॉजी (२.९७%), भारती एअरटेल (२.७३%), भारत फोर्ज (२.१२%), एशियन पेंटस (१.९१%), न्यूजेन सॉफ्टवेअर (१.८४%), विप्रो (१.०३%), एलआयसी (२.०६%), डिवीज (१.९९%), इन्फोऐज इंडिया (१.९१%), हिन्दुस्तान एरोनॉटिक्स (१.८३%), श्री सिमेंट (१.३९%), कॅनरा बँक (१.३८%), पंजाब नॅशनल बँक (१.१२%), नेस्ले इंडिया (१.०९%) चोलांमंडलम फायनान्स (१.०४%), भारत इलेक्ट्रॉनिक्स (०.९९%), बजाज ऑटो (०.९१%), इटर्नल (०.६४%), एचसीएल टेक्नॉलॉजी (०.६२%), आयसीआयसीआय बँक (०.५४%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' १० जुलै रोजी भारतीय बेंचमार्क निर्देशांक नकारात्मक क्षेत्रात बंद झाले, साप्ताहिक एफ अँड ओ एक्सपायरीनंतर व्यापक नफा बुकिंग (Profit Booking) सुरू असताना निफ्टी २५,३५० च्या पातळीकडे सरकला. निर्देशांक दैनिक चार्टवर एकत्रीकरण क्षेत्राच्या खालच्या बँडभोवती होता, जो जवळच्या काळातील ट्रेंड डायनॅमिक्समध्ये संभाव्य बदल सूचित करतो. जागतिक अनिश्चित ता आणि भारत-अमेरिका लघु व्यापार कराराबद्दल स्पष्टतेचा अभाव यामुळे वाढ नियंत्रित राहिली म्हणून सकारात्मक अमेरिकन संकेत भावना उंचावण्यास अपयशी ठरले.बंद होताना सेन्सेक्स ३४५.८० अंकांनी किंवा ०.४१ टक्क्यांनी घसरून ८३१९०.२८ वर आणि निफ्टी १२०.८५ अंकांनी किंवा ०.४७ टक्क्यांनी घसरून २५३५५.२५ वर बंद झाला. धातू आणि रिअल्टी वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांक नकारात्मक क्षेत्रात बंद झाले, फार्मा, टेलिकॉम, आयटी, पीएसयू बँक आणि एफ एमसीजी निर्देशांकांमध्ये व्यापक दबाव दिसून आला, प्रत्येकी ०.५% घसरण झाली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांकांनी त्यांचा सुधारात्मक टप्पा वाढवला, बाजारातील मंदावलेल्या भावनांमुळे प्रत्येकी ०.३% ने घसरला.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' निर्देशांक २५५०० च्या वर टिकून राहू शकला नाही आणि गेल्या पाच सत्रांच्या श्रेणी २५६००-२५३०० च्या खालच्या बँडजवळ सत्र बंद झाल्या मुळे निर्देशांकाने कमी उच्च आणि कमी सिग्नलिंग सुधारात्मक पूर्वाग्रहासह एक मोठी बेअर कॅन्डल तयार केली. पुढे जाऊन, आम्हाला अपेक्षा आहे की निफ्टी गेल्या पाच सत्रांचे एकत्रीकरण २५३००-२५६०० च्या श्रेणीत वाढवेल. २५६०० च्या वर निर्णायक हालचालीमुळेच २५८०० च्या अंकांकडे आणखी वर उघडेल. संरचनात्मकदृष्ट्या, व्यापक कल सकारात्मक राहतो आणि नजीकच्या काळात निर्देशांक २५२००-२५८०० बँडच्या आत व्यापार करण्याची शक्यता आहे. प्रमुख स्थितीत्मक आधार २५२००-२५००० वर ठेवण्यात आला आहे. जोपर्यंत निर्देशांक या महत्त्वपूर्ण समर्थन क्षेत्राच्या वर राहील तोपर्यंत आम्ही खरेदी-ऑन-डिप्स धोरण राखतो.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, 'बँक निफ्टीने मंदीचा एक मेणबत्ती तयार केला ज्याने मागील दोन सत्रांच्या किंमत कृतीला पूर्णपणे वेढले, ज्यामुळे उच्च पातळीवर नफा बु किंगचे संकेत मिळत होते. गेल्या पाच सत्रांमध्ये अपेक्षित रेषांवर निर्देशांक ५६५००-५७६०० च्या श्रेणीत एकत्रित होताना दिसत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक हाच विस्तार करेल आणि ५७६०० च्या वर गेल्यास येत्या आठवड्या त ५८२००-५८५०० च्या पातळीकडे आणखी वर उघडेल. प्रमुख अल्पकालीन आधार ५६०००-५५५०० क्षेत्रावर ठेवण्यात आला आहे, जो ५० दिवसांच्या EMA (Exponenential Moving Average EMA) प्रमुख रिट्रेसमेंट पातळीचा संगम (Consolidation) दर्शवितो. व्यापक कल सकारात्मक राहतो आणि कोणत्याही घसरणीकडे खरेदीच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की, 'टीसीएसच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांपूर्वी आयटी समभागांमधील कमकुवतपणामुळे भारतीय समभाग दिवसाचा शेवट लाल रंगात झाला. आयटी आणि वित्त क्षेत्रांकडून हंगामाची सुरुवात मंदावण्याची अपेक्षा असल्याने पहिल्या तिमाहीच्या निकालांपूर्वी गुंतवणूकदारांची भावना सावध राहिली आहे. तथापि, आयटी समभागांमध्ये अलिक डच्या काळात झालेल्या एकत्रीकरणामुळे मंदावलेल्या दृष्टिकोनावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे पुढील चिंता मर्यादित झाल्या आहेत. दरम्यान, मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये मर्यादित नकारात्मक कृती होती, जी लार्ज कॅप कंपन्यां च्या तुलनेत चांगल्या कमाईच्या अंदाजाच्या वाढत्या अपेक्षेदरम्यान प्रतीक्षा आणि पाहण्याचा दृष्टिकोन दर्शवते.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की, 'दैनिक चार्टवरील गर्दीच्या झोनमधून ब्रेकडाउन झाल्यानंतर निफ्टी खाली घसरला, ज्यामुळे सध्याच्या मंदीच्या भावनांना बळकटी मिळाली. याव्यतिरिक्त, निर्देशांक २१-तासांच्या घातांकीय मूव्हिंग सरासरीच्या खाली गेला आहे. दैनिक चार्टवरील आरएसआय (१४) देखील नकारात्मक झाला आहे, जो कमकुवत गती दर्शवितो. अल्पावधीत हा ट्रेंड कम कुवत राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे आणखी घसरण होऊ शकते. खालच्या टोकाला, समर्थन २५२५०-२५२०० वर आहे, तर वरच्या टोकाला, प्रतिकार पातळी २५४०० आणि २५५०० वर आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर रूपयांच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की, 'डॉलर निर्देशांकातील सौम्य मजबूती आणि भांडवली बाजारातील कमकुवतपणामुळे भावनेवर परिणाम झाल्यामुळे रुपया ८५.६५ च्या जवळ स्थिर राहिला, जो ०.०७% ने घसरला. कालच्या जोरदार तेजीनंतर, काही प्रमाणात नफा बुकिंग देखील दिसून आली. रुपया ८५.३० ते ८५.९० च्या श्रेणीत व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीचे तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक सुंदर केवात म्हणाले की,'देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये मंदीचे सत्र दिसून आले कारण निफ्टी २५,५११ वर स्थिर होता आणि दिवसाच्या बहुतेक वेळेस श्रेणीबद्ध राहिला. निर्देशांकाने दिवसाच्या अंतर्गत उच्चांक २५५२४ वर पोहोचला आणि नंतर २५३५७ च्या नीचांकी पातळीवर घसरला, हे प्रमुख ट्रिगरच्या आधी सावध गुंतवणूकदारांच्या भावना दर्शवते. क्षेत्रीय कामगिरी मिश्रित होती.
धातू, रिअल्टी आणि वित्तीय सेवांमध्ये खरेदीची आवड दिसून आली, तर आयटी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, फार्मा आणि उपभोग समभाग निर्देशांकांना खाली ओढले. जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार नसल्याने बाजाराची व्याप्ती तुलनेने कमकुवत होती. जागतिक स्तरावर, बाजारातील सहभागींनी संभाव्य अमेरिका-भारत व्यापार कराराच्या आसपासच्या विकसित होत असलेल्या कथेवर लक्ष ठेवले, दोन्ही बाजू वाटाघाटींच्या गुंतागुंतीतून काम करत असल्याने भावना मंदावल्या.
दरम्यान, पहिल्या तिमाहीच्या उत्पन्न हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षा वाढल्या होत्या, आयटी प्रमुख टीसीएस आज नंतर आकडेवारीची परेड सुरू करणार आहे. डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, टाटा एलेक्ससी, बीडीएल, केफिन टेक्नॉलॉजीज, एलआयसी आणि पीआय इंडस्ट्रीज सारख्या शेअर्समध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट बिल्डअप दिसून आले, जे सक्रिय ट्रेडिंग इंटरेस्ट दर्शवते. साप्ताहिक समाप्तीसाठी, सर्वोच्च कॉल ओपन इंटरेस्ट २५५०० आणि २५६०० स्ट्राइक किमतींवर केंद्रित आहे, तर पुट बेस २५५०० आणि २५४०० वर आहे, जे समर्थन पातळी राखण्यात अयशस्वी झाल्यास रेंज-बाउंड हालचाली आणि मंदीच्या बायसची शक्यता दर्शवते.'
त्यामुळे एकूणच बाजारातील परिस्थिती पाहता उद्या बँक, फायनांशियल सर्विसेस, आयटी, फार्मा व अंतिमतः निफ्टी निर्देशांकातील हालचालीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरणार आहे.