Tennis Player Radhika Yadav Murder News: टेनिसपटू राधिका यादवची निर्घृण हत्या, वडिलांवर हत्येचा आरोप

सोशल मीडियावर रील बनवल्याबद्दल वडील राधिकावर रागावले. 


हरियाणा: भारतातून टेनिस विश्वाला हादरवणारी एक दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.  गुरुवारी हरियाणातील गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या वडिलांवरच हत्येचा आरोप करण्यात आला आहे. वडिलांनी राधिकावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या,  त्यापैकी तीन तिला लागल्या. ज्यात तिचा मृत्यू झाला. राज्य स्तरावर गौरव मिळवून देणाऱ्या आपल्या लेकीचा वडील खुन का करतील याचा तपास पोलिस करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास २५ वर्षीय टेनिस खेळाडू राधिका यादवच्या वडिलांनीच तिची गोळी घालून हत्या केली. टेनिस खेळाडू तिच्या कुटुंबासह येथील सेक्टर ५७ मधील पहिल्या मजल्यावर राहत होती. राधिकाला गंभीर अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुग्राम पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आणि घटनास्थळावरून रिव्हॉल्व्हर जप्त केला.



हत्येचे कारण काय?


सोशल मीडियावर रील बनवल्याबद्दल वडील राधिकावर रागावले होते. याबद्दल त्यांच्यात भांडण झाले होते. दरम्यान त्यांनी तिला गोळ्या झाडून मारले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तथापि, पोलिसांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.  



राधिका यादव कोण होती?


राधिका राज्यस्तरीय टेनिसपटू होती आणि तिने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन (ITF) मध्ये दुहेरी टेनिसपटू म्हणून राधिका यादवचे रँकिंग ११३ होते. राधिका यादवचा जन्म २३ मार्च २००० रोजी झाला होता आणि ती ITF दुहेरीत टॉप २०० मध्ये होती.


 
Comments
Add Comment

बिबट्याच्या दहशतीचा अखेर अंत! ११ बकऱ्या, एका वासराचा फडशा पाडणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

- सलग दोन हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे गावकऱ्यांनी सोडला

Nashik : ३८ कोटींच्या फसवणुकीचा आरोप, निलेश बाफना यांचा जामीन अर्ज फेटाळला

Nashik : टी.जे.एस.बी. सहकारी बँकेची (T.J.S.B. Sahakari Bank) तब्बल ३८ कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या

Monsoon Update 2026 : भारतात मान्सूनचा हाहाकार! अनेक राज्यांत पूर, दरडी कोसळल्या; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

गुजरातसह उत्तर आणि ईशान्य भारतात पावसाचे थैमान नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या सुरुवातीला काहीसा मंदावलेला

BHARAT TAXI : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'भारत टॅक्सी' सेवेचा शुभारंभ; मोबाईल ॲपवरून कार, रिक्षा आणि बाईक टॅक्सी बुकिंगची सुविधा

मध्यस्थ कमी होऊन सेवा अधिक पारदर्शक होणार https://prahaar.in/2026/07/23/pmfby-revised-pradhan-mantri-fasal-bima-yojana-implemented-in-maharashtra-for-2026-27-appeal-made-apply-by-july-31/ मुंबई :

Ashish Shelar : मुंबईत उभे राहणार अत्याधुनिक वाहन स्क्रॅपिंग केंद्र

- मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; वैज्ञानिक पद्धतीने बेवारस वाहनांची विल्हेवाट लावणार मुंबई : मुंबईतील वाढती

PMFBY : महाराष्ट्रात सन २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्रात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून,