Tennis Player Radhika Yadav Murder News: टेनिसपटू राधिका यादवची निर्घृण हत्या, वडिलांवर हत्येचा आरोप

सोशल मीडियावर रील बनवल्याबद्दल वडील राधिकावर रागावले. 


हरियाणा: भारतातून टेनिस विश्वाला हादरवणारी एक दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.  गुरुवारी हरियाणातील गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या वडिलांवरच हत्येचा आरोप करण्यात आला आहे. वडिलांनी राधिकावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या,  त्यापैकी तीन तिला लागल्या. ज्यात तिचा मृत्यू झाला. राज्य स्तरावर गौरव मिळवून देणाऱ्या आपल्या लेकीचा वडील खुन का करतील याचा तपास पोलिस करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास २५ वर्षीय टेनिस खेळाडू राधिका यादवच्या वडिलांनीच तिची गोळी घालून हत्या केली. टेनिस खेळाडू तिच्या कुटुंबासह येथील सेक्टर ५७ मधील पहिल्या मजल्यावर राहत होती. राधिकाला गंभीर अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुग्राम पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आणि घटनास्थळावरून रिव्हॉल्व्हर जप्त केला.



हत्येचे कारण काय?


सोशल मीडियावर रील बनवल्याबद्दल वडील राधिकावर रागावले होते. याबद्दल त्यांच्यात भांडण झाले होते. दरम्यान त्यांनी तिला गोळ्या झाडून मारले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तथापि, पोलिसांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.  



राधिका यादव कोण होती?


राधिका राज्यस्तरीय टेनिसपटू होती आणि तिने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन (ITF) मध्ये दुहेरी टेनिसपटू म्हणून राधिका यादवचे रँकिंग ११३ होते. राधिका यादवचा जन्म २३ मार्च २००० रोजी झाला होता आणि ती ITF दुहेरीत टॉप २०० मध्ये होती.


 
Comments
Add Comment

उबाठाच्या त्या माजी ज्येष्ठ नगरसेवकांना बसावे लागणार घरी

मुंबई (खास प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत उबाठाने आता तरुणांना आणि नवीन चेहऱ्यांनाच

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून