Smartwork Coworking IPO GMP: आजपासून बाजारात कंपनीचा IPO, 'ही' आहे GMP कंपनीला पहिल्या दिवशी ०.३७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले

  35

प्रतिनिधी: स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसेस (SCSL) कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात खुला होत आहे. हा आयपीओ ५८२.५६ कोटी रूपयांचा असणार आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे. यामध्ये १.०९ कोटी समभागांची विक्री होणे अपेक्षित आहे. एकूण आयपीओपैकी ०.३७% वाटा म्हणजेच १३७.५६ ऑफर फॉर सेल (OFS) असेल असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने ३८७ ते ४०७ रूपये प्रति समभाग इतका प्राईज बँड निश्चित केला गेला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आज १० जुलै ते १४ जुलैपर्यंत आयपीओ सामान्य गुंतवणूकदारासाठी खुले राहणार आहेत.

पहिल्या दिवशी 'इतके' सबस्क्रिप्शन -

बाजारातील आकडेवारीनुसार, आयपीओला पहिल्या दिवशी ०.३७% सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी ०.४७% तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ०.६४ पटीने सबस्क्राईब केले आहे. कर्मचाऱ्यांकडून ०.४४% सबस्क्रिप्शन मिळाले. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) वर्गाकडून अजून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

इतकी आहे GMP किंमत!

बाजारातील उपलब्ध माहितीनुसार, सध्या मूळ किंमतीपेक्षा GMP ३१ रुपये प्रिमियम दराने सुरू आहे. परवा मात्र कंपनीचे समभाग स्थिरच होते. काल मूळ किंमतीपेक्षा २९ रूपये प्रिमियम दराने समभगावर बोली लावली जात होती.

बोलीसाठी (Bidding) खुले असलेल्या आयपीओतील समभागाचे वाटप (Allotment) १५ जुलैला होणार आहे. १७ जुलैला कंपनी बीएसई, एनएसई यावर कंपनी सूचीबद्ध (Listed) होणार आहे. अर्ज करण्यासाठी किमान ३६ समभागांचा गठ्ठा (Lot) खरेदी करावा लागेल. किरकोळ गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी कमीत कमी १३९३२ रूपयांची गुंतवणूक अनिवार्य असणार आहे. कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, आयपीओतील १०१३५१ समभाग कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आरक्षित ठेवून प्रति समभाग ३५ रूपये प्रमाणे त्यांना सवलत मिळेल. जे एम फायनांशियल लिमिटेड ही आयपीओची बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे. MUFG Intime India Private Limited (Linkintime) कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. याशिवाय,एकूण १४३१३४०० समभागापैकी १०९३३६६० समभाग विक्रीसाठी उपलब्ध असतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी ४९.६२% समभाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (४९.६५%), विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यांच्यासाठी १४.८९%, कर्मचाऱ्यांसाठी ०.७१% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. यापूर्वीच कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून १७३.६४ कोटी रुपये उभारले आहेत.

कंपनीबद्दल -

नितीश सारडा, हर्ष बिनानी, सौम्या बिनानी, एन एस निकेतन, एस एन एस इन्फ्रारिअल्टी एल एल पी, आर्यदिप रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे कंपनीतील भागभांडवल ६५.१९% होते ते आयपीओनंतर घसरून ५८.२५% होईल. २०१५ साली स्थापन झालेली ही कंपनी वर्क सोल्यूशनशी संबंधित आहे. मागणीनुसार ऑफिसस्पेस बनवणे ही कंपनीची प्रमुख सेवा आहे. कंपनी छोट्यामोठ्या उद्योगांसहित अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही कार्यालयीन जागा उपलब्ध करून देते.

कंपनीची आर्थिक परिस्थिती -

मागील वर्षाच्या ३१ मार्च २०२४ तुलनेत कंपनीच्या महसूलात ३१ मार्च २०२५ पर्यंत इयर ऑन इयर बेसिसवर २७% वाढ झाली. मात्र इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) मध्ये २६% घसरण झाली आहे. कंपनीच्या महसूलात ३१ मार्च २०२४ पर्यंत १११३.११ कोटींचा महसूल मिळाला होता जो ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढत १४०९.६७ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर मागील वर्षीच्या ४९.९६ कोटीचे नुकसान झाले होते जे वाढत ३१ मार्च २०२५ पर्यंत ६३.१८ कोटी झाले.कंपनीच्या करपूर्व नफा (EBITDA) ३१ मार्च २०२४ पर्यंत ६५९. ६७ कोटीत वाढ होत ३१ मार्च २०२५ पर्यंत कंपनीला ८५७.२६ कोटींपर्यंत वाढला होता. सध्याच्या घडीला कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४६४४.८२ कोटी रुपये आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर गुंतवणूकदारांची देणी चुकवण्यासाठी, भांडवली खर्चासाठी, इयर दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

Jansurksha Bill : जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई: बहुचर्चित 'राज्य जनसुरक्षा विधेयक' अखेर आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं आहे. शहरी नक्षलवाद

शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना आणणार

राज्यात शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट कृषी विकासासाठी सर्व योजनांमधून ६९ हजार ८८९

Jansurksha Bill : महाराष्ट्राला 'जनसुरक्षा कवच'

'शहरी नक्षलवादा'ला लगाम बसणार, १३ हजार सूचनांनी विधेयक तयार! जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर, तेरा हजार सूचनांनी

Tata Consultancy Services TCS Q1 Results: मोठी बातमी! बहुप्रतिक्षित टीसीएसचा निकाल जाहीर ! 'इतक्या' टक्क्याने निव्वळ नफ्यात वाढ महसूलात मात्र....

प्रतिनिधी: टाटा कन्सल्टंसी सर्विसेस (Tata Consultancy and Services TCS) कंपनीने आपला बहुप्रतिक्षित निकाल जाहीर केला आहे. कंपनीला

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी

'कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याने इतिहासाच्या काळ्या खुणा पुसल्या'

मुंबई : भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा अशी ओळख असेलेल्या कर्नाक या ब्रिटीश गव्हर्नरच्या नावाने मुंबईत