
पहिल्या दिवशी 'इतके' सबस्क्रिप्शन -
बाजारातील आकडेवारीनुसार, आयपीओला पहिल्या दिवशी ०.३७% सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी ०.४७% तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ०.६४ पटीने सबस्क्राईब केले आहे. कर्मचाऱ्यांकडून ०.४४% सबस्क्रिप्शन मिळाले. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) वर्गाकडून अजून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
इतकी आहे GMP किंमत!
बाजारातील उपलब्ध माहितीनुसार, सध्या मूळ किंमतीपेक्षा GMP ३१ रुपये प्रिमियम दराने सुरू आहे. परवा मात्र कंपनीचे समभाग स्थिरच होते. काल मूळ किंमतीपेक्षा २९ रूपये प्रिमियम दराने समभगावर बोली लावली जात होती.
बोलीसाठी (Bidding) खुले असलेल्या आयपीओतील समभागाचे वाटप (Allotment) १५ जुलैला होणार आहे. १७ जुलैला कंपनी बीएसई, एनएसई यावर कंपनी सूचीबद्ध (Listed) होणार आहे. अर्ज करण्यासाठी किमान ३६ समभागांचा गठ्ठा (Lot) खरेदी करावा लागेल. किरकोळ गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी कमीत कमी १३९३२ रूपयांची गुंतवणूक अनिवार्य असणार आहे. कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, आयपीओतील १०१३५१ समभाग कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आरक्षित ठेवून प्रति समभाग ३५ रूपये प्रमाणे त्यांना सवलत मिळेल. जे एम फायनांशियल लिमिटेड ही आयपीओची बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे. MUFG Intime India Private Limited (Linkintime) कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. याशिवाय,एकूण १४३१३४०० समभागापैकी १०९३३६६० समभाग विक्रीसाठी उपलब्ध असतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी ४९.६२% समभाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (४९.६५%), विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यांच्यासाठी १४.८९%, कर्मचाऱ्यांसाठी ०.७१% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. यापूर्वीच कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून १७३.६४ कोटी रुपये उभारले आहेत.
कंपनीबद्दल -
नितीश सारडा, हर्ष बिनानी, सौम्या बिनानी, एन एस निकेतन, एस एन एस इन्फ्रारिअल्टी एल एल पी, आर्यदिप रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे कंपनीतील भागभांडवल ६५.१९% होते ते आयपीओनंतर घसरून ५८.२५% होईल. २०१५ साली स्थापन झालेली ही कंपनी वर्क सोल्यूशनशी संबंधित आहे. मागणीनुसार ऑफिसस्पेस बनवणे ही कंपनीची प्रमुख सेवा आहे. कंपनी छोट्यामोठ्या उद्योगांसहित अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही कार्यालयीन जागा उपलब्ध करून देते.
कंपनीची आर्थिक परिस्थिती -
मागील वर्षाच्या ३१ मार्च २०२४ तुलनेत कंपनीच्या महसूलात ३१ मार्च २०२५ पर्यंत इयर ऑन इयर बेसिसवर २७% वाढ झाली. मात्र इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) मध्ये २६% घसरण झाली आहे. कंपनीच्या महसूलात ३१ मार्च २०२४ पर्यंत १११३.११ कोटींचा महसूल मिळाला होता जो ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढत १४०९.६७ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर मागील वर्षीच्या ४९.९६ कोटीचे नुकसान झाले होते जे वाढत ३१ मार्च २०२५ पर्यंत ६३.१८ कोटी झाले.कंपनीच्या करपूर्व नफा (EBITDA) ३१ मार्च २०२४ पर्यंत ६५९. ६७ कोटीत वाढ होत ३१ मार्च २०२५ पर्यंत कंपनीला ८५७.२६ कोटींपर्यंत वाढला होता. सध्याच्या घडीला कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४६४४.८२ कोटी रुपये आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर गुंतवणूकदारांची देणी चुकवण्यासाठी, भांडवली खर्चासाठी, इयर दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.