उत्तेजक चाचणीत दोषी : रौप्यपदक विजेती कुस्तीपटू रितिका हुडा चार वर्षांसाठी निलंबित

  47


नवी दिल्ली : आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी आणि २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत विजेती ठरलेली कुस्ती खेळाडू रितिका हुडा हिला चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (नाडा) हा निर्णय घेण्यात आला आहे. २२ वर्षीय रितिका हूडा हिने ऑलिंपिकमध्ये ७६ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे भारतासाठी हा मोठा धक्का ठरला आहे.


आशियाई अजिंक्पयद स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. कुस्तीपटूंच्या निवड चाचणीदरम्यान १५ मार्च रोजी उत्तेजक चाचणीही घेण्यात आली. तिच्या 'युरिन' चाचणीदरम्यान प्रतिबंधित पदार्थाचा समावेश असल्याचे समोर आले. यामुळे तिला चार वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.



याप्रसंगी रितिका हूडा म्हणाली, अजूनही काहीही निश्‍चित झालेले नाही. मी काहीही चुकीचे केलेले नाही. अधिकाऱ्यांना माझ्याकडून सहकार्य लाभणार आहे. नाडाकुस्ती संघटनेवर माझा विश्‍वास आहे. यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही, असे ती म्हणाली. रितिका हुडा बी नमुना चाचणी करण्याचा विचार करीत आहे. आगामी काळात या नमुना चाचणीचा निकाल येण्याची शक्यता आहे.


रितिका हूडा हिला चार वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे भारताच्या विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीला धक्का पोहोचला आहे. रितिका हूडा हिच्याकडून भारताला पदक पटकावण्याच्या आशा होत्या. यावर्षी रितिका हिने तीन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. फक्त एकाच लढतीत ती पराभूत झाली होती. भारताचे भविष्य म्हणून तिच्याकडे बघितले जात आहे.


Comments
Add Comment

आधार कार्ड नागरिकत्त्वाचा पुरावा नाही, सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाचे उत्तर

नवी दिल्ली : आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे उत्तर निवडणूक आयोगाने आज, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात

कॅनडामध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार, Video सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा येथील KAP'S CAFE वर गोळीबार झाला आहे. हल्लेखोरांनी कारमधून पिस्तुल काढत

अयोध्येत रामललांसाठी बनणार सागवानी लाकडाचे भव्य मंदिर

अयोध्या : २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. रामललाची प्राणप्रतिष्ठा

दिल्ली एनसीआर आणि हरियाणात भूकंप

नवी दिल्ली :  दिल्ली एनसीआरमध्ये गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणाच्या काही भागांनाही भूकंपाचे

वडोदरात गंभीरा पूल अपघातात १० जणांचा मृत्यू, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा !

वडोदरा: गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी ७:३० वाजता महिसागर नदीवरील ४३

'निस्तार' भारतीय नौदलात दाखल, पहिले स्वदेशी पाण्याखालील मदतकार्य करणारे जहाज

विशाखापट्टणम : 'निस्तार' हे स्वदेशी रचना आणि निर्मिती असणारे पाण्याखाली उतरून मदतकार्य करणारे पहिलेच जहाज