आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित

  53

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक आणि वस्तीगृह अधीक्षिकेला निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.


विधानसभा सदस्य राजकुमार बडोले, धर्मरावबाबा आत्राम, नाना पटोले यांनी प्रश्न उत्तरेच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते.



राज्यात ‘कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)’ हे अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत नियमित आरोग्य तपासणी व सर्वेक्षण केले जाते. याच सर्वेक्षण दरम्यान वरवणे येथील आश्रमशाळेतील कुमारी खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीच्या डाव्या डोळ्याखाली चट्टा आढळून आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तिच्यावर कुष्ठरोग विरोधी बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आले होते. दुर्दैवाने, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी सुरू असून शवविच्छेदन अहवालानुसार टिशू अ‍ॅस्ट्रोपॅथोलॉजिकल तपासणी व रक्तनमुने केमिकल विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.


दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या स्तरावर देखील या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून संबंधित मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांना अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांनी निलंबित केले असून त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देखील देण्यात आले आहे. आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आदिवासी विकास विभागाला सूचना देण्यात येतील, असेही सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सभागृहात सांगितले.

Comments
Add Comment

Jansurksha Bill : जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई: बहुचर्चित 'राज्य जनसुरक्षा विधेयक' अखेर आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं आहे. शहरी नक्षलवाद

शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना आणणार

राज्यात शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट कृषी विकासासाठी सर्व योजनांमधून ६९ हजार ८८९

Jansurksha Bill : महाराष्ट्राला 'जनसुरक्षा कवच'

'शहरी नक्षलवादा'ला लगाम बसणार, १३ हजार सूचनांनी विधेयक तयार! जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर, तेरा हजार सूचनांनी

Tata Consultancy Services TCS Q1 Results: मोठी बातमी! बहुप्रतिक्षित टीसीएसचा निकाल जाहीर ! 'इतक्या' टक्क्याने निव्वळ नफ्यात वाढ महसूलात मात्र....

प्रतिनिधी: टाटा कन्सल्टंसी सर्विसेस (Tata Consultancy and Services TCS) कंपनीने आपला बहुप्रतिक्षित निकाल जाहीर केला आहे. कंपनीला

'कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याने इतिहासाच्या काळ्या खुणा पुसल्या'

मुंबई : भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा अशी ओळख असेलेल्या कर्नाक या ब्रिटीश गव्हर्नरच्या नावाने मुंबईत

ऐतिहासिक सिंदूर पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा अशी ओळख असलेल्या कर्नाक या ब्रिटीश गव्हर्नरच्या नावाने मुंबईत