Thursday, July 10, 2025

Varun Sardesai Nilam Gorhe: जराश्या धक्क्याने वरूण सरदेसाईंचा अकांडतांडव, नीलम गोऱ्हेंनी झापलं

Varun Sardesai Nilam Gorhe: जराश्या धक्क्याने वरूण सरदेसाईंचा अकांडतांडव, नीलम गोऱ्हेंनी झापलं
मुंबई: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सरकार आणि विरोधक या दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर खडाजंगी पाहायला मिळते आहे. यादरम्यानच सभागृहात जातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यात नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षारक्षकांच्या जराश्या धक्क्याने उबाठा गटाचे आमदार वरुण सरदेसाई अकांड तांडव करताना दिसतात. ज्यात ते "इथे अतिरेकी घुसलेत का?" असे बोलताना दिसून आले. पाहा व्हिडीओ



 










View this post on Instagram























 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)






शिवसेनेना आणि उबाठा गटाचे नेते विधिमंडळ अधिवेशनात आक्रमक झाल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये आता नीलम गोऱ्हे आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये झालेल्या 'दे धक्का' प्रकरणाचा देखील समावेश झाला आहे. आज दुपारच्या प्रहरी शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकाचा चुकून धक्का लागल्याने उबाठा पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विनाकारण कांगावा केला.

काय आहे या व्हिडीओमध्ये?


विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे विधानभवनात जात असताना उबाठाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सुरक्षारक्षकाचा धक्का लागल्यानं संताप व्यक्त केला. इथं काय अतिरेकी घुसलेत,दुसऱ्यांदा धक्का लागला मला, दुसऱ्यांदा झालं हे, असे कसे धक्के लागतात, असा सवाल त्यांनी केला. यादरम्यान नीलम गोऱ्हे यांनी मुद्दामहून धक्का लागलेला नाही, मी नम्रपणे सांगतेय तरी तुम्ही खेकसताय, ही कुठली तुमची संस्कृती असं म्हणाल्या. यानंतर नीलम गोऱ्हे विधानभवनात गेल्या.
Comments
Add Comment