मुंबई: नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर येथील उरण फाटा येथे पारसिक हिलवर वृक्षतोडीबाबत पाहणी करण्यात आली आहे. पारसिक हिल ठिकाणी उच्च विद्युत वाहिनी पॉवर कॉरिडॉर असून वृक्षामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी फक्त झुडुपाची छाटणी केली आहे. येथे वृक्षतोड झाली आहे का, याबाबत चौकशी केली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विधानपरिषद सदस्य भाई जगताप, शशिकांत शिंदे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता, त्यावेळी मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, आजबाजूच्या परिसरात बांधकाम चालू करण्यासाठी अनधिकृत जंगलतोड होत असेल, तर याची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यावर कठोर कार्यवाही केली जाईल.