'नाफा'ला उपस्थित राहणार मंत्री आशिष शेलार

सॅनहोजे : मराठी चित्रपटांना हॉलिवूडच्या झगमगाटात सन्मानाने सादर करणाऱ्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) तर्फे आयोजित दुसरा भव्य मराठी चित्रपट महोत्सव सॅनहोजे, कॅलिफोर्निया येथे २५ ते २७ जुलै २०२५ या कालावधीत होणार आहे. कॅलिफोर्निया थिएटर या प्रतिष्ठित स्थळी हा सोहळा आयोजित केला जाणार आहे.

'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे निर्माते, सुवर्ण-कमळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाची सुरुवात गेल्यावर्षी करण्यात आली आहे. यावर्षी या महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले आहे.. तसेच 'सॅनहोजे' कॅलिफोर्निया स्टेटचे महापौर यांनाही या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले असून दोन्ही अतिथींनी संस्थेस त्यांचा तात्काळ होकार कळविला आहे. सॅनहोजेचे महापौर आणि महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक मंत्री यानिमित्ताने पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र येत आल्याचे नाफा संस्थापक अभिजित घोलप यांनी जाहीर केले आहे.



नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी नुकतीच महाराष्ट्रात येऊन सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांची भेट घेऊन त्यांना या सोहळ्याचे रितसर निमंत्रण दिले आहे. शेलार यांनी त्यांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत तात्कळ होकार दिला आहे. विशेष म्हणजे अमेरिकाच्या सॅनहोजे, कॅलिफोर्निया राज्याचे महापौर मॅट महन यांनीही या महोत्सवास उपस्थित राहण्याचे मान्य केल्याने हा एक दुग्धशर्करा योग चालून आला असून यानिमित्ताने या दोन महनीय अतिथींच्या उपस्थितीने यंदाची अवार्ड नाईट आणि महोत्सव विशेष ठरणार असल्याची भावना अभिजित घोलप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Add Comment

धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारली, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी

'ऊत' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रकाशित

जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना

‘१२० बहादूर’चा जबरदस्त ट्रेलर

सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या ‘१२० बहादूर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या

राम चरणच्या अंदाजात आणि ए.आर. रहमानच्या सुरावटीची जादू; ‘पेड्डी’चं पहिलं गाणं ‘चिकिरी चिकिरी’ प्रदर्शित!

राम चरणच्या आगामी पेड्डी चित्रपटाबद्दल वाढत्या उत्सुकतेदरम्यान आता त्याचं पहिलं गाणं चिकिरी चिकिरी प्रदर्शित

अभिनेता पुष्कर जोग दुबईला होणार स्थायिक! मुलीच्या भविष्यासाठी घेतला भारत सोडण्याचा निर्णय

मुंबई: दुबई हे सध्या अनेक भारतीयांच्या पर्यटनाचे आकर्षण ठरले आहे. त्यात भारतीय कलाकार केवळ सुट्ट्यांसाठी नव्हे,