
ते पुढे म्हणाले की, दर महिन्याला आमच्या प्रवाशांची संख्या सरासरी ५% ने वाढत आहे. आम्ही मुंबईकरांना अखंड, सुरक्षित, वक्ताशीर आणि पर्यावरणपूरक सेवा देण्यास सदैव कटिबद्ध आहोत. याच दिवशी आम्ही एक नवा हरित विक्रमही केला. एकूण ६२ हजार २८२ प्रवाशांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून, कागदविरहित तिकिटांची निवड केली, जो आजवरचा सर्वाधिक आकडा आहे. व्हॉटस्अॅप आधारित मेट्रो तिकिटिंगमध्ये महामुंबई मेट्रो देशात आघाडीवर आहे. आमच्या एकूण तिकीट विक्रीपैकी २०% बुकिंग व्हॉट्सअॅपवरून होते.